जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

कोपरगाव तालुक्यातील…या ग्रामपंचायतींची निवडणूक रंगणार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत.त्यामुळं राज्यातील या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार असले तरी मतदार याद्या जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे त्यात कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर,कोळपेवाडी,चासनळी,माहेगाव देशमुख,चांदेकसारे,धारणगाव सह २६ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.त्यामुळे राजकीय प्रक्रियांना वेग आला असून हा अकाली शिमगा कसा रंगणार याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे.

दरम्यान यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायती असून त्यात भोजडे,सडे,शिंगणापूर,वेस-सोयगाव,कोळपेवाडी,वडगाव,मोर्विस,खिर्डी गणेश,पढेगाव,चासनळी,माहेगाव देशमुख,रांजणगाव देशमुख,शहापूर,बहादराबाद,डाऊच बु.डाऊच खु.देर्डे-कोऱ्हाळे,तळेगाव मळे,चांदेकसारे,धारणगाव,हंडेवाडी,बत्तरपूर,सोनेवाडी,खोपडी,करंजी बु.बहादरपूर आदींचा त्यात समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला लिहिलेल्या पत्रात कोविड- १९ आजाराबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूका टप्या-टप्याने घेण्यात आल्या आहेत.आता राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७६४९ तसेच नवनिर्मित ८ तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ अशा एकूण ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका घेणे क्रमप्राप्त आहे.मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे २-३ महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्यानं राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाल पत्र लिहून प्रशासक नेमण्याविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान दि.३१ मे २०२२ची विधानसभा यादी गृहीत धरून मतदार यादी वापरण्याचा सूचना निवडणूक आयोगाने दि.४ ऑक्टोबर रोजी दिल्या आहेत.त्यात प्रभागनिहाय याद्या राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.दि.१२ ऑक्टोबर रोजी पर्यंत मतदार याद्या डाऊन लोड करण्याचे व त्याची प्रत तयार करण्याचे आदेश दिले आहेत.यात मतदार संघाबाहेरील नावे वगळण्याचे आदेश दिले आहेत.प्रभाग निहाय यादी दि.१३ ऑक्टोबर प्रसिद्धी करण्यात येणार आहे.हरकती दाखल करण्यासाठी मुदत दि.१३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर रोजी ठरवून दिली असून याद्यातील दुरुस्ती करून त्या दि. २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करावयाची आहे.

दरम्यान यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायती असून त्यात भोजडे,सडे,शिंगणापूर,वेस-सोयगाव,कोळपेवाडी,वडगाव,मोर्विस,खिर्डी गणेश,पढेगाव,चासनळी,माहेगाव देशमुख,रांजणगाव देशमुख,शहापूर,बहादराबाद,डाऊच बु.डाऊच खु.देर्डे-कोऱ्हाळे,तळेगाव मळे,चांदेकसारे,धारणगाव,हंडेवाडी,बत्तरपूर,सोनेवाडी,खोपडी,करंजी बु.बहादरपूर आदींचा समावेश आहे.त्या मुले या गावात राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

कोपरगाव तालुक्यात कोल्हे व काळे हे पारंपरिक राजकीय विरोधक असून परजणे,शिवसेना,भाजप निष्ठावान गट (वहाडणे) आदींचा राजकीय शिमगा रंगणार आहे.आता राजकारणात कोल्हे काळे यांची तिसरी पिढी कार्यरत झाली आहे.तसे राजकारणांची पातळी घसरली आहे.मुबलक पैसा,दारू,आणि कार्यकर्त्यांची खरेदी या पलीकडे जाऊन राजकारण होणार का ? हा औत्सुक्याचा विषय आहे.त्यामुळे यावर्षी होणाऱ्या निवडणुका आता तिसरी पिढी कशी हाताळणार या कडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close