निवडणूक
वकील संघाच्या निवडणुकीत जहालमतवादी वकील विजयी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वकील संघाच्या आज मोठया उत्साहात संपन्न झालेल्या निवडणुकीत ॲड.दिलीप चिंतामणी लासुरे हे 204 पैकी 96 मते घेऊन विजयी झाले आहे तर दुसऱ्या क्रमांकाची 62 मते ॲड.रशीद जिलानी शेख यांनी मिळवली असल्याचे उघड झाले आहे.तर महिला उपाध्यक्ष पदांची निवडणूक ॲड.करुणा सुधीर सोनवणे यांनी 128 मते मिळवून जिंकली आहे.तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वकील मंजिरी गौतम जोशी यांना 74 मते मिळवली असल्याचे निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी ॲड.एस.एम.गुजर यांनी जाहीर केले आहे.वकिलांनी या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे.नवीन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपराव वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.दिलीप लासुरे या जहाल मतवादी वकिलांनी मैदान मारले आहे.ते विद्यमान आ.आशुतोष काळे यांचे कट्टर विरोधक आणि त्यांचेच माहेगाव देशमुख येथील रहिवासी आहे.ते आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात.त्यांनी यापूर्वी आपल्या स्वाभिमानी बाण्यामुळे नोकरीवर लाथ मारून वकील व्यवसायात प्रवेश केला आहे.तर कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना निवडणूक त्यांच्या सहकाऱ्यांनी शेपूट गुंडाळले असतानाही स्वबळावर लढवून उच्चांकी मते मिळवून प्रस्थापितांना घाम फोडला होता.तर कृषि उत्पन्न बाजार समितीत आपले नशीब आजमावले होते.त्यांनी शेतकरी संघटनेंत काही काळ काम केले आहे.सामाजिक कार्यात यांचे नेहमी योगदान राहिले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव वकील संघ राज्यात प्रसिद्ध असल्याचे मानले जाते.येथील वकिलांनी अनेक खटले गाजवले आहे.त्यामुळे या निवडणुकीकडे अहिल्यानगरसह रहायचे लक्ष लागून राहत असते.गतवर्षी कोपरगांव वकिल संघ निवडणूकीत नामनिर्देशन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपल्या तलवारी म्यान केल्याने यात अध्यक्ष पदासाठी ॲड.शरद गुजर यांची बिनविरोध निवड झाली होती.तर यावेळी चौरंगी सामना रंगला आहे.त्यात या पदासाठी अँड.दिलीप लासुरे यांचेसह अनुप ठोळे,अँड.रशीद शेख,अँड.रत्नप्रभा भोंगळे आदी चार जण आपले नशीब आजमावत होते.तर महिला उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार अँड.करुणा सुधीर सोनावणे व अँड.मंजिरी गौतम जोशी यांनी मैदानात उतरवून एकमेकांना आव्हान दिले होते.त्याचा निकाल आज सायंकाळी 05 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.शरद गुजर यांनी जाहीर केला आहे.त्यात वकील संघाच्या अध्यक्ष पदी ॲड.दिलीप लासुरे यांनी मैदान मारले आहे.

दरम्यान दुसऱ्या स्थानी ॲड.रशीद जिलानी यांनी आपले स्थान राखले आहे.तर महिला अध्यक्ष पदासाठी ॲड.करुणा सोनवणे यांनी आपला झेंडा फडकवला आहे.दरम्यान या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन मत पत्रिका शिक्का नसल्याने बाद झाल्या आहे.या निवडणुकीत एकूण 218 मतदार होते.पैकी 204 जणांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला असल्याचे उघड झाले आहे.तर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ॲड.अनुप ठोळे यांना 41 मतांची बिदागी मिळाली आहे तर ॲड.रत्नप्रभा भोंगळे यांना केवळ 05 मतांवर समाधान मानावे लागले आहे.मतदार माघार घेण्याचे दिवशी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार अँड.निलेश रामभाऊ कातकडे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली असून तीच बाब सचिव पदासाठी उमेदवार अँड.दिपक जाधव यांचे बाबतीत घडली आहे.याशिवाय सह-सचिव पदासाठी उमेदवार म्हणून अँड.प्रशांत जयवंत मोकळ यांनी तर खजिनदार पदासाठी उमेदवार अँड.राहुल राजाराम वाकचौरे यांनी यापूर्वीच मैदान मारले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड.एस.एम.गुजर यांनी काम पाहिले आहे तर त्यांना सहायक निवडणूक अधिकारी ॲड.परेश डागा यांनी सहाय्य केले आहे.


