निवडणूक
वकील संघाचा आज शिमगा होणार?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राज्यात प्रसिद्ध असलेल्या कोपरगाव वकील संघाची अध्यक्षपदाची आज निवडणूक संपन्न होत असून या पदासाठी अँड.दिलीप लासुरे,अनुप ठोळे,अँड.रशीद शेख,अँड.रत्नप्रभा भोंगळे आदी चार जण आपले नशीब आजमावत असून या निवडणुकीकडे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान या कोपरगाव वकील संघाच्या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभेच्या मतदारांप्रमाणे हॉटेलची शाकाहारी आणि मांसाहारी,’त…री’ तोंडी लावली असल्याची जोरदार चर्चा सुरू असून अनेक इच्छुकांनी घरोघरी जाऊन आपला प्रचार करून आपणच या पदासाठी कसे नामी…! आहोत असा दावा केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
गतवर्षी कोपरगांव वकिल संघ निवडणूकीत नामनिर्देशन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपल्या तलवारी म्यान केल्याने यात अध्यक्ष पदासाठी ॲड.शरद गुजर यांची बिनविरोध निवड झाली होती.तर उपाध्यक्षपदी ॲड.महेश भिडे तर सचिव पदी ॲड.परेश डागा तर महिला उपाध्यक्ष पदी ॲड.सविता कदम यांची सह सेक्रेटरी ॲड.महेंद्र जाधव व खजिनदार ॲड.नितीन गिरमे,तर सह सेक्रेटरी ॲड.महेंद्र जाधव व खजिनदार ॲड.नितीन गिरमे आदींची बिनविरोध निवड झाली होती.मात्र या वर्षी या प्रसिद्ध वकील संघाचे या पदांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याने हि बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही त्यामुळे हा चौरंगी सामना रंगला आहे.

दरम्यान आज कोपरगाव वकील संघाचे मतदान दुपारी ०४ वाजेपर्यंत संपन्न होणार असून त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन सायंकाळी ०५ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.शरद गुजर आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲड.परेश डागा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
दरम्यान कोरोना काळात कोणाला विचारत न घेता निवडणूक बिनविरोध करण्याचा भीम पराक्रम येथील काही पदाधिकाऱ्यांनी गतकाळात केला आहे.हे अनेकाना विदित आहेच.त्याचे अनेकाना स्मरण झाले आहे.दरम्यान आज होणाऱ्या मतदानासाठी २१८ मतदार आपला मताचा अधिकार बजावणार असून हा मतांचा अधिकार आज किती जण बजावणार हे लवकरच कळणार आहे.त्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी ॲड.एस.एम.गुजर, सहायक निवडणूक अधिकारी,ॲड.परेश डागा हे आपले कर्तव्य बजावत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


