निवडणूक
कोपरगावला मिळणार आणखी एक आमदार !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आहे.भाजपने ६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे.भाजपच्या वाट्याला १० पैकी ६ जागा आहेत.विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाले होते.तर इतर ५ जणांच्या नावांवर काल उशिरा शिक्कामोर्तब करण्यात आला असून यात कोपरगाव येथील सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे नाव निश्चित केले असल्याने त्यांचे समर्थकांनी रात्री फटाके वाजवून जल्लोष केला असल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी युती शासनाच्या काळाचे आधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान पाटील वहाडणे यांना भाजपने 1982-94 मध्ये पहिल्यांदा संधी दिली होती.त्यावेळी ते 1988 साली विधानपरिषदेचे उपाध्यक्ष बनले होते.त्यानंतर 44 वर्षांनी आणि तरुणाला पहिल्यांदा ही संधी मिळत आहे.त्यामुळे आगामी काळात कोपरगाव शहर आणि तालुक्याचा विकास मोठ्या गतीने होईल असे मानले जात आहे.विशेष म्हणजे दोन्ही आमदार हे सताधाऱ्यांबरोबर असल्याची ही पहिलेच वेळ असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान अन्य उमेदवारात भाजपकडून विद्यमान नेत्यांना डावलून अनेक अनुभवी तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे दिसून येत आहे.यात जामखेड येथील सुनील विनायक कर्जतकर,माधवी नाईक,संजय नत्थूजी भेंडे,प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव आदींचा समावेश आहे.भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या ५ जणांची नावे अंतिम करताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव तालुक्यात विद्यमान आ.आशुतोष काळे आणि माजी आ.कोल्हे कुटुंबात एकच वेळी दोघांना संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे.यापूर्वी युती शासनाच्या काळाचे आधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान पाटील वहाडणे यांना भाजपने 1982-94 मध्ये पहिल्यांदा संधी दिली होती.त्यावेळी ते 1988 साली विधानपरिषदेचे उपाध्यक्ष बनले होते.त्यानंतर 44 वर्षांनी आणि तरुणाला पहिल्यांदा ही संधी मिळत आहे.त्यामुळे आगामी काळात कोपरगाव शहर आणि तालुक्याचा विकास मोठ्या गतीने होईल असे मानले जात आहे.विशेष म्हणजे दोन्ही आमदार हे सताधाऱ्यांबरोबर असल्याची ही पहिलेच वेळ असल्याचे मानले जात आहे.दरम्यान या राज्याच्या राजकारणात आणि तालुक्याच्या राजकारणात विरोधक चिमटीत पकडता येईल इतकाच शिल्लक ठेवला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तालुक्याचे भविष्य खरेच उज्ज्वल होईल की हुकुमशाहिकडे वाटचाल करील हे पाहणे ही बाब औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोपरगाव तालुक्याचे शेती पाण्याची वाट लागली आहे.तालुक्यातील आणि शहरातील रस्ते असून नसल्यासारखे झाले आहे.झगडेफाटा ते वडगाव पान हा रस्ता अपघातांची राजधानी ठरला आहे.तो राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित होण्याची गरज आहे.औद्योगिक वसाहतीचा मार्ग रोखला गेला आहे.सावळीविहिर ते लासलगाव रस्त्याचे काम रेंगाळले आहे.शिर्डी ते कोपरगाव रस्ता गेली नऊ वर्षे संपूनही अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही.झगडेफाटा येथील उड्डाणपुलपूर्ण होऊनही त्यांचा संलग्न रस्त्याला मुहूर्त लाभलेला नाही.जुना नागपूर मार्ग चार पदरी होणे गरजेचे बनले आहे.कोपरगाव शहर पाणी योजनेवर पहिल्यांदा 41 नंतर 131 कोटी रुपये खर्ची पडूनही शहराला अद्याप चार दिवसांनी पाणी मिळत आहे.प्रत्येक दिवशी पाणी मिळणे ही बाब दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.



