जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

निळवंडे कालवे गाजले,युवराजांनीं घेतला काढता पाय!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली असुन सभेत दोन-तीन विषय वाचून झाले असताना त्या ठिकाणी संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे आगमन झाले असता त्यांनी अध्यक्षा नंतर थेट भाषण सुरु केले त्यावेळी त्यांनी निळवंडे कालव्यांचा विषय छेडला असता त्यास उपस्थित शेतकरी व सभासदांनी जोरदार विरोध करून त्यांच्या बोलण्याचे खंडन केले त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली केल्याने त्यांना आपले भाषण गुंडाळावे लागले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

दरम्यान या घटनेमुळे गत विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आ.कोल्हे यांना असाच विरोध बहादरपूर झाला होता.त्याआधी संगमनेर तालुक्यातील कासारे गावाने असाच लढा उभारून सन-२०१९ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान संगमनेर नगर पालिकेच्या अध्यक्षा सौ.तांबे यांना गावाबाहेर रोखले होते व गावात घुसून दिले नव्हते.गत महिन्यात नुकत्याच संपलेल्या हरींनाम सप्ताहात कासारे या ठिकाणी माजी महसूल मंत्री यांच्या कन्या यांनीही “सांगे वडिलांची कीर्ती” उद्योग केला होता.तो उद्योग केल्यावर तेथील भाविकांनी त्यांना पिटाळून लावले होते याची आठवण ताजी झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानांत सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा संपन्न होत असून त्या साठी सर्वत्र सहकारी संस्थाची तयारी सुरु आहे.त्यात वादविवाद सुरु असून हे खरे लोकशाहीचे लक्षण मानले जात आहे.त्यावरून काही ठिकाणी स्थानिक वाद-विवाद नेहमीच होत असतात.तर काही ठिकाणी बाहेरील पाहुण्यांना आणून आपल्या संस्थेचे हित साधण्याचा प्रयत्न संस्थाचालक करताना दिसत आहे.त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती,ग्रामपंचायती व बाजार समितीच्या निवडणूका समोर असल्याने विविध नेते या व्यासपिठांचा वापर आपल्या मतांची बेगमी खुबीने करताना करताना दिसत आहेत.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे घडली आहे.येथील अंजनापूर सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सभा संस्थेने आयोजित केली होती.अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब गव्हाणे हे होते.त्या ठिकाणी मंदिरासमोर सदर बैठक संपन्न होत असताना त्या ठिकाणी विषय पत्रिकेवरील सभेचे दोन-तीन काही विषय वाचून झाले असताना त्या ठिकाणी कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी सहकारी कारखाना या सहकारी संस्थेचे अध्यक्ष विवेक कोल्हे आले असता अध्यक्षांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले होते.

त्या नंतर थेट त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती.त्या त्यांनी अगोदर आपल्या आजोबांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी काय-काय केले,कसे-कसे केले याचे,”सांगू वडिलांची कीर्ती” या न्यायाने विवेचन सुरु केले व त्या नंतर त्यांनी आपल्या मातोश्री यांनी काय-काय केले याची जंत्री वाचायला सुरुवात केली असता त्यात त्यांनी आपल्या मातोश्री यांनी सन-२०१४ साली प्रथम निवडून आल्यावर नागपूर येथील “हिवाळी अधिवेशनात निळवंडे प्रश्न उपस्थित करून कालव्यांचे पाणी देण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे वस्तुस्थितीला सोडून गोडवे गायले व पायऱ्यांवर बसून आंदोलन केले” असल्याची आठवण करून दिली असताना सदर ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली.त्यास उपस्थित शेतकऱ्यांनी उभे राहून जोरदार विरोध केला असून तुम्ही काय केले ते अजिबात सांगू नका” असे म्हटले आहे.

“आमचे निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी गावांना अद्याप बावन्न वर्ष उलटूनही दिले नाही यापूर्वी तुमची सत्ता किती वेळा आली आणि गेली किती वेळा मंत्री पद भूषवले याची आठवण करून देत दुष्काळी व लाभक्षेत्रातील १८२ गावांना त्यांचे हक्काचे आरक्षण असतांना पिण्याचे व शेतीचे पाणी का दिले नाही ? त्यावर कोणी दरोडा घातला ? कोपरगाव शहराला पाणी कमी नसताना ते का पळवले जात आहे.आमचे १८२ गावांचे आरक्षण दिसत नाही का ? या गावांनी ग्रामसभाचे ठराव शासनाला व जलसंपदाला व जीवन प्राधिकरणाला दिले तुम्हाला माहिती नाही का ? असा जाबसाल केला आहे.आता निवडणूका आल्यावर त्याची आठवण आली का ? या पूर्वी आठ वर्षांपूर्वी श्री साई बाबा संस्थानचे ५०० कोटी जाहिर केलेले व आपल्या मातोश्रीनी मोठमोठे बॅनर लावून श्रेय घेतले ते पैसे कोठे गेले ? त्याचे काय झाले ?

त्यावेळी कोल्हे यांनी आम्ही कालव्याचे करण्याचे बाजूचे आहोत असे लटके सांगूनही काही उपयोग झाला नाही.त्यावेळी बाबासाहेब गव्हाणे,भाऊसाहेब गव्हाणे,अशोक गव्हाणे यांनी त्यांना थेट हिशोब सांगितला आहे.व कोपरगाव शहराला पाणी कमीच नसल्याचे हिशेब देऊन सांगितलं आहे त्यापैकी केवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्केच पाणी उचलले जात असताना वाढीव पाण्याची गरज काय ? येवला तालुक्यातील राजापूरसह ४२ गावांनी दारणा धरणातून पाणी पळवले तेंव्हा तुम्ही कोठे होते ? निळवंडे कालवा कृती समितीने उच्च न्यायालयात दीर्घ न्यायालयीन लढा उभारला व लढला नसता तर तुम्ही अजूनही पन्नास वर्ष पाणी दिले नसते उगीच काहीबाही बोलू नका असे खडसावले आहे.त्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी बोलणाऱ्या कार्यकर्त्याचे स्वागत केले असून या बोलण्यावर टाळ्यांचा गडगडाट केला आहे.त्यावेळी आपली काही खैर नाही असे दिसताच त्यांना घटनास्थळावरुन काढता पाय घ्यावा लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close