जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

कोपरगाव शहरात शिवजयंती उत्सव संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात शिवसेना सालाबादा प्रमाणे यावर्षी तिथीप्रमाणे शिवरायांची जयंती उत्सव साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.त्यात दोन गटांचे स्वतंत्र कार्यक्रम संपन्न झाले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे व माजी शहर प्रमुख दत्ता पुंडे यांचे शुभ हस्ते शिवरायांची आरती व पूजन करण्यात येऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे.हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.मात्र काही नागरिक तो तिथी प्रमाणे साजरा करत असतात.कोपरगाव शहरात तो आज मोठ्या उत्साहत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे.मात्र यात सेनेचे दोन गट पडल्याचे उघड झाले आहे.कोणी कुठे कार्यक्रम साजरे करायचे यावरून दोन गटात नमनालाच घडाभर तेल वाया गेले होते मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी आपला हिसका दाखवल्यावर दोन्ही गट त्यास राजी झाले होते.त्या शहराध्यक्ष सनी वाघ यांनी तो मिरवणुकीने तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे गटाने तो डॉ.आंबेडकर मैदानात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरा केला आहे.सकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांना तोफांची सलामी दिली असून त्या नंतर अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देत पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण केले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे व माजी शहर प्रमुख दत्ता पुंडे यांचे शुभ हस्ते शिवरायांची आरती व पूजन करण्यात येऊन शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे.

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव,सनी गायकवाड,मनील नरोडे देवा लोखंडे विनोद गलांडे,शहर संघटक,वैभव कुऱ्हाडे,विठ्ठल भुजाडे,गौरव गांगुले,गौरव तांबे,प्रसाद खिल्लारी,सूरज अग्रवाल,शुभम वायखिंडे,अभिजित जगधने आदी अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close