जाहिरात-9423439946
जयंती,पुण्यतिथी अभिवादन

क्रांतिकारक भांगरे यांचे पेशवाई नंतर मोठे योगदान-पराक्रम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

पेशव्यांच्या १८१८ साली पराभवानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत हस्तक्षेप करून मोठा अनर्थ घडवून आणला होता.त्याला त्यांनी चोख उत्तर देऊन इंगजांना,’सळो की पळो’ करून सोडले असल्याचे प्रतिपादन आदिवासी महादेव कोळी युवक संघाचे नगर जिल्हा अध्यक्ष अमित आगलावे यांनी नुकतेच कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“राजूर प्रांताच्‍या रिक्‍त असलेल्‍या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजींनी अर्ज केला परंतु ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून अमृतराव कुलकर्णी यांची पोलीस अधिकारी म्‍हणून नेमणूक केली.पुढे कोकणातील एका दरोडा प्रकरणात राघोजींचा सहभाग असल्‍याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठविला.वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करताच राघोजींना अटक करण्‍याचा आदेश काढला त्यातून हा संघर्ष वाढत गेला होता”-अमित आगलावे,अध्यक्ष,आदिवासी महादेव कोळी युवक संघ,नगर जिल्हा.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची १७४ वी पुण्यतिथी कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी युवक संघ नगर जिल्हा शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी मनोहर शिंदे,सुनील पोरे,महारु चव्हाण,शरद शिंदे,अशोक उंडे,गोविंद आढळ,भरत आगळे,धनंजय आगळे,नारायण चौरे,बाळासाहेब भांगरे,सखाराम घोडे,बाळू दिघे,शिवाजी वळवी,नानासाहेब शिरसाठ,दगूराम शिरसाठ,संतोष शिंदे,शिवराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”पेशव्यांच्या १८१८ साली पराभवानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत असलेले किल्ले,वतने यांकडे मोर्चा वळविला.त्यामुळे रामजी भांगरे यांच्या नेतृत्‍वाखाली रतनगडावर गोविंदराव खाडे,वाळोजी भांगरे,लक्षा ठाकर इत्यादींनी इग्रजांच्या विरोधात जाहीर उठाव केला; तथापि त्यांचा १८२१ ला पराभव झाला.रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक केली.पुढे खटला चालवून त्‍यांना काळ्या पाण्‍याची शिक्षा दिली.वडिलांच्‍या अनुपस्थितीत राघोजी आपल्‍या गावात पोलीस पाटील पदाचा कारभार पाहत होते.आपल्‍या चोख कारभारामुळे राजूर पोलीस ठाण्‍यात राघोजींना इतरांपेक्षा अधिक मान होता.राजूर प्रांताच्‍या रिक्‍त असलेल्‍या पोलीस अधिकारी पदासाठी राघोजींनी अर्ज केला परंतु ब्रिटिशांनी ही मागणी फेटाळून अमृतराव कुलकर्णी यांची पोलीस अधिकारी म्‍हणून नेमणूक केली.पुढे कोकणातील एका दरोडा प्रकरणात राघोजींचा सहभाग असल्‍याचा खोटा अभिप्राय अमृतराव कुलकर्णी यांनी सरकारला पाठविला.वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी पुरेसा तपास न करताच राघोजींना अटक करण्‍याचा आदेश काढला.राघोजी पोलीस ठाण्‍यात हजर झाले.आपल्‍यावरील खोट्या आरोपाचा जाब त्यांनी विचारला.या दरम्‍यान राघोजी व अमृतराव यांच्‍यात बाचाबाची झाली.या वादात अमृतराव मारले गेले.पुढे राघोजी आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष तीव्र झाला.व त्या नंतर अनेक वर्ष त्यानी संघर्ष करून इंग्रजी सत्तेला नको-नको करून सोडले होते.मात्र ते पंढरपूर येथे आल्यावर त्यांना इंग्रज अधिकारी लेफ्टनंट जनरल गेल याने शेकडो पोलिसांचा फौजफाटा घेऊन मंदिराला वेढा दिला व राघोजींना ताब्यात घेतले (१८४७). त्‍यांच्यावर खटला भरून ठाणे येथील कारागृहात फाशी देण्‍यात आली असल्याचे शेवटी सांगितले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अशोक शिंदे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close