क्रीडा विभाग
कराटे स्पर्धेत दोन विद्यार्थीनींना सुवर्ण पदकाची कमाई !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
संजीवनी सैनिक स्कूलच्या आवारात असलेल्या कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या कराटे व तायक्वांदो स्पर्धेत कोपरगाव येथील कन्या विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी तेजस्विनी अमित खोकले आणि आठवीतील विद्यार्थिनी खुशी गायकवाड यांना सदर स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोपरगाव येथील संस्थेचे प्राध्यापक सुदर्शन पांढरे यांनी सुरू केलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ अनेक विद्यार्थिनी घेत असताना दिसून येत आहे.त्याबाबत एक स्पर्धा नुकतीच संजीवनी सैनिक स्कूलच्या आवारात असलेल्या कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात कु.तेजस्विनी खोकले आणि कु.खुशी गायकवाड या दोन विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे.त्या आता आगामी काळात संपन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत आता नेतृत्व करणार आहे.
आजच्या आधुनिक आणि आव्हानात्मक काळात शालेय विद्यार्थिनींना कराटे शिक्षण देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.केवळ खेळ किंवा शारीरिक व्यायाम म्हणून नाही,तर मुलींच्या सुरक्षिततेच्या,मानसिक आणि शारीरिक विकासाच्या दृष्टीने कराटे हे एक प्रभावी माध्यम आहे.त्यासाठी विविध संस्था पुढाकार घेऊन तर काही खाजगी संस्था या मुलींना प्रशिक्षित करत आहे ही समाधानाची बाब आहे.कोपरगाव येथील संस्थेचे प्राध्यापक सुदर्शन पांढरे यांनी सुरू केलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ अनेक विद्यार्थिनी घेत असताना दिसून येत आहे.त्याबाबत एक स्पर्धा नुकतीच संजीवनी सैनिक स्कूलच्या आवारात असलेल्या कोपरगाव तालुका क्रीडा संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यात कु.तेजस्विनी खोकले आणि कु.खुशी गायकवाड या दोन विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे.त्या आता आगामी काळात संपन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत आता नेतृत्व करणार आहे.त्यांना संस्थेचे प्राध्यापक सुदर्शन पांढरे,स्नेहल पांढरे,सप्तमी डहारे तसेच कन्या शाळेतील शिक्षिका पटणे मॅडम,प्राचार्या धनक मॅडम,शिक्षक श्री.देवकर,श्री शेख आदींचे मार्गदर्शन लाभले होते.
दरम्यान या विद्यार्थ्यांनीचे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,नगराध्यक्ष पराग संधान,कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलिस निरीक्षक दिपक रोठे,नगरसेवक मेहमूद सय्यद आदींनी अभिनंदन केले आहे.कु.तेजस्विनी खोकले ही कोपरगावचे रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांची कन्या आहे.



