जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

माजी उपसरपंच भाबड यांना पितृशोक !

न्यूजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

  कोपरगाव नजीक असलेल्या जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब भाबड यांचे पिताश्री आणि माजी कुस्तीपटू मोतीराम सावळेराम भाबड (वय-92) यांचे आज मध्यरात्री 12.03 वाजता निधन झाले आहे.त्यांचे पश्चात एक मुलगा,सुना,नातू आदी परिवार आहे.त्यांचेवर कोपरगाव येथील गोदावरीतीरी असलेल्या नगरपरिषद अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांचे निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.मोतीराम भाबड यांचे छायाचित्र.
 स्व.मोतीराम सावळेराम भाबड हे मनमिळावू आणि धाडसी व्यक्तिमत्वासाठी ओळखले जात होते.त्यांनी साठच्या दशकातील पहिलवान म्हणून त्यांनी आपले नाव कमावले होते.त्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रात प्रवेश करून प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.त्यानंतर त्यांनी जेऊर पाटोदा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे जवळपास 18 वर्षे संचालक पद भूषवले होते.वर्तमानात ते याच संस्थेचे संचालक होते.

    स्व.मोतीराम सावळेराम भाबड हे मनमिळावू आणि धाडसी व्यक्तिमत्वासाठी ओळखले जात होते.त्यांनी साठच्या दशकातील पहिलवान म्हणून त्यांनी आपले नाव कमावले होते.त्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रात प्रवेश करून प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.त्यानंतर त्यांनी जेऊर पाटोदा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे जवळपास 18 वर्षे संचालक पद भूषवले होते.वर्तमानात ते याच संस्थेचे संचालक होते.त्यांचे पश्चात त्यांचे पुत्र भाऊसाहेब भाबड यांनी जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती.त्यांचे अंत्यविधीसमयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

  दरम्यान स्व.मोतीराम भाबड यांचे निधनाबद्दल माजी आ.अशोक काळे,आमदार आशुतोष काळे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव,कोपरगाव नगरपरिषदेचे गटनेत्या गौरी दार पहाडे,माजी गटनेते वीरेन बोरावके आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close