जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

शहरातील बाल संरक्षण समिती स्थापन करा-मागणी                          

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
                          
   बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या 2015 च्या परिपत्रकानुसार प्रत्येक प्रभागात बाल संरक्षण समिती स्थापन करणे हे बंधनकारक असल्याने या कायदेशीर बाबींचा विचार करून या समित्या लवकरात लवकर स्थापन कराव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.अशोक गावित्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

नगराध्यक्ष पराग संधान यांना निवेदन देताना डॉ.अशोक गावित्रे.

   

  “वर्तमानात बालविवाह,बालमजुरी,अमली पदार्थाचे सेवन,लैंगिक अत्याचार इत्यादीचे प्रमाण वाढत चालले असून मागील काही वर्षात कोपरगाव शहरांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींनी आत्महत्या देखील केलेली आहेत या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या समितीचा निश्चितच उपयोग होईल”-डॉ.अशोक गावित्रे,कोपरगाव.

   बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ हा भारतातील १८ वर्षांखालील काळजीसंरक्षणाची गरज असलेल्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मुलांच्या कल्याणासाठी,पुनर्वसनासाठी व सुरक्षिततेसाठी तयार केलेला प्रमुख कायदा आहे.यात १५ जानेवारी २०१६ पासून सुधारित तरतुदींसह गंभीर गुन्ह्यांमध्ये १६-१८ वयोगटातील किशोरवयीन मुलांवर प्रौढांप्रमाणे खटला चालवण्याची तरतूद आहे.गुन्ह्याचा आरोप असलेल्या मुलांच्या प्रकरणांचा निवाडा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल न्याय मंडळाची स्थापना केली जाते.तर बाल कल्याण समिती काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या हितासाठी ही समिती काम करते.अनाथ आणि सोडून दिलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी हा कायदा मध्यवर्ती दत्तक संसाधन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्वसन व दत्तक प्रक्रिया एक सुलभ आणि पारदर्शक दत्तक प्रक्रिया प्रदान करतो.मुलांशी संबंधित गुन्हे,जसे की त्यांना अंमली पदार्थ देणे किंवा बालमजुरीसाठी त्यांचा वापर करणे,यासाठी या कायद्यात सात वर्षांपर्यंतच्या कडक शिक्षेची तरतूद आहे.प्रकरणांचा निकाल लावताना मुलांच्या सर्वोत्तम हिताचा विचार करून ‘बाल-स्नेही’ वातावरण निर्माण करण्यावर या कायद्याचा भर दिलेला आहे.

  दरम्यान वर्तमानात बालविवाह,बालमजुरी,अमली पदार्थाचे सेवन,लैंगिक अत्याचार इत्यादीचे प्रमाण वाढत चालले असून मागील काही वर्षात कोपरगाव शहरांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींनी आत्महत्या देखील केलेली आहेत या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या समितीचा निश्चितच उपयोग होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.या समितीचा अध्यक्ष हा नगरसेवक असून अंगणवाडी सेविका या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात तसेच एक अठरा वर्षे  वयाची मुलगी व एक 21 वर्षाचा मुलगा यांचा सहभाग या समितीमध्ये असतो.तसेच डॉक्टर,वकील,शाळेचे मुख्याध्यापक,पोलीस अधिकारी,स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचाही या समितीत सहभाग करून घेता येतो कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली असून सर्व ग्रामसेवकांची व अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा देखील डॉ.अशोक गावित्रे यांनी घेतलेली आहे.

   यामुळे या समित्या लवकरात लवकर स्थापन कराव्या अशी मागणी डॉ.अशोक गावित्रे यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप तसेच नगराध्यक्ष पराग संधान व महिला बालकल्याण समितीच्या सभापती सविता कैलास मंजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close