आदिवासी विकास
आदिवासी वाड्या वस्त्यांवरील विद्युत रोहित्रासाठी ६५.७१ लाखांचा निधी – माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील विजेच्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम सन-२०२६-२७ अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील आदिवासी वस्त्या आणि नवीन गावठाण गुरुकुल विकसित करण्यासाठी लाभार्थ्यांना दिलेल्या जागेत रोहित्र बसवण्यासाठी ६५ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

आ.काळे यांच्या पाठपुराव्यातून कोळगाव थडी येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ११ लाख २ हजार,कुंभारी येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ८ लाख ३६ हजार,कारवाडी येथील आदिवासी वस्तीमध्ये ६३ के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ६ लाख ४३ हजार,मुर्शतपूर येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ६ लाख ३६ हजार,चांदगव्हाण येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ५ लाख ९७ हजार तर संवत्सर येथे नवीन गावठाण गुरुकुल विकसित करण्यासाठी रामवाडी येथे १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर आदी कामे मंजूर करण्यात आली असल्याचा दावा केला आहे.
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविला जाणारा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विकासाचा विशेष कार्यक्रम आहे.जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या व गरजेनुसार आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधी दिला जातो.आरोग्य धोका असलेल्या माता,बालके (ग्रेड ३-४) यांच्यासाठी औषध खरेदी व आरोग्य सुविधा पुरविणे.शासकीय व अनुदानित आश्रमशाळा,निर्वासित विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन,निवास,गणवेश व साहित्य पुरविणे.शबरी आदिवासी घरकुल योजना आणि ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र पुरवणे आदी पायाभूत सुविधांचा विकास करणे आदी कामे केली जातात.कोपरगाव मतदारसंघातील अनेक आदिवासी बांधवांना वीज जोडणीस येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आ.काळे यांनी महावितरण आणि जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्यातून कोळगाव थडी येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ११ लाख २ हजार,कुंभारी येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ८ लाख ३६ हजार,कारवाडी येथील आदिवासी वस्तीमध्ये ६३ के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ६ लाख ४३ हजार,मुर्शतपूर येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ६ लाख ३६ हजार,चांदगव्हाण येथील आदिवासी वस्तीमध्ये १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व लाईन कामासाठी ५ लाख ९७ हजार तर संवत्सर येथे नवीन गावठाण गुरुकुल विकसित करण्यासाठी रामवाडी येथे १०० के.व्ही.ए.ट्रान्सफॉर्मर व एबी केबल टाकण्याच्या कामासाठी १५ लाख ७३ हजार व दशरथ वाडी येथे ६३ के.व्ही.ए .ट्रान्सफॉर्मर व एबी केबल टाकण्याच्या कामासाठी ११ लाख ८३ हजार अशा एकूण ६५.७१ लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.त्याबद्दल आ.काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आभार मानले आहे.
आदिवासी वाड्या- वस्त्यांवरील विज रोहीत्रांसाठी निधी मंजूर झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पासरले असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.



