गुन्हे विषयक
पेट्रोल पंपावर चाकूने हल्ला,एक ठार,एक जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या दहिगाव बोलका नजीक रेल्वे उड्डाण पुलानजीक असलेल्या विशाल जगताप यांच्या पेट्रोल पंपावर व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या भोजराज बाबुराव घनघाव (वय-४०) यांच्यावर तीन जणांनी केलेल्या चाकू हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी होऊन त्यात त्यांचे उपचार सुरू असताना शिर्डी येथील रुग्णालयात निधन झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.घटनास्थळी कोपरंगाव शहर पोलीस दाखल झाले असून ते तेथील चलचित्रण तपासात असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास कोपरगाव शहर पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान यातील मयत बापू घनघाव यांचे पश्चात आई,वडील,पत्नी व दोन मुले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या घटनेत आणखी एक इसम जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथे प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान या घटनेतील तीन आरोपी त्याच गावातील असल्याचे समजते तेथील चलचित्रणात बंदिस्त झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून आरोपीनी घटनास्थळावरून धूम ठोकली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यातील एक आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र हल्ल्याचे कारण समोरील हॉटेल मध्ये जेवण झाल्यानंतर आरोपी पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर गेले होते.त्याच्या बिलावरून हि दुर्घटना झाली असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणी अमोल धोंडीराम मोहिते (वय-२५) रा.मांदुणे ता.चाळीसगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन अनोळखी बजाज पल्सर दुचाकी.नं.एम.एच.१७ सी.डब्ल्यु.९१०४ आरोपीविरुद्ध गुन्हा क्रं.३१०/२०२३ भा.द.वि.कलम ३०२,२४ दाखल केला आहे.आरोपीनी घटनास्थळावरून पलायन केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करत आहेत.