कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात खरीपाचे बाधांवर जाउन पंचनामे सुरु
न्यूजसेवा
कुभांरी- ( गहिनीनाथ घुले)
राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती त्या प्रमाणे जोराचा व प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे खरीपाचे नुकसान झाले होते.त्या नुकसानीचे पंचनामे अकरण्याचे आदेश नूकतेच राज्य शासनाने दिले होते.त्या प्रमाणे कोपरगाव तालुक्यात त्यास प्रारंभ झाला असून कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असे बांधावर जाऊन पंचनामे सुरु करण्यात आले आहे.
राज्यात मेघगर्जनेसह तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला होता.त्या प्रमाणे कोपरगाव तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.त्यामुळे मुर्शतपुर शिवारात दोन जण वाहून गेले आहे.या शिवाय शिरसगाव,भोजडे आदी ठिकाणी कोळ नदीवर वहाने वाहून जाण्याचा अनास्था प्रसंग ओढवला होता.दरम्यान सरकारने या प्रकरणी पंचनामे करण्याचा आदेश दिला होता.त्या प्रमाणे कृषी विभागाने हे काम सुरु केले आहे.
हवामान खात्याने वर्तविलेला अंदाजाप्रमाणे केरळ,महाराष्ट्र,तमिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याचे सांगितले होते.त्यामुळे आठ ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविली होती.मराठवाड्यात मेघगर्जनेसह तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवण्यात आला होता.त्या प्रमाणे कोपरगाव तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.त्यामुळे मुर्शतपुर शिवारात दोन जण वाहून गेले आहे.या शिवाय शिरसगाव,भोजडे आदी ठिकाणी कोळ नदीवर वहाने वाहून जाण्याचा अनास्था प्रसंग ओढवला होता.दरम्यान सरकारने या प्रकरणी पंचनामे करण्याचा आदेश दिला होता.त्या प्रमाणे कृषी विभागाने हे काम सुरु केले असल्याचे प्रमाण मिळाले आहे.या पंचनाम्यात सोयाबीन,बाजरी,ज्वारी,मका,घास,आदी खरीप पिकांचा समावेश आहे.
तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स आता आय.सी.आय.सी.आय.लोम्बाड मध्ये विलीन झाले असुन तालुका प्रतिनिधी पंकज रोहम तसेच जिल्हा प्रतिनिधी शशि भुषन यानी सर्वांनी मिळून तालुक्यातील पंचनामे शासनाच्या नियमानुसार गावोगाव शेतकऱ्यांचे बाधांवर जाऊन सुरु आहे.याचाच प्रत्यय कुभांरी,हिंगणी येथे आला यावेळी कृषी अधिकारी संजय शिंदे व नारायण ठाणगे कोतवाल,राजीव वडितके यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केले असुन लवकरात लवकर जास्त शेतकऱ्यां पर्यंत पोहचू असा आशावाद शिदे यांनी व्यक्त केला आहे.