कोपरगाव तालुका
महाराष्ट्र जनकल्याण समितीस ११ हजारांची देणगी

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव कालकुंद्री यांचे जेष्ठ बंधू सेवानिवृत्त शासकीय अधिकारी सुरेशराव कालकुंद्री यांनी कोरोना साथीत सापडलेल्या नागरिकांना उपचारार्थ महाराष्ट्र जनकल्याण समितीस ११ हजारांची देणगी नुकतीच प्रदान केली आहे.त्यांच्या या उपक्रमाबद्दल शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता टाळेबंदी वाढविण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.सरकार कोरोना बाधित नागरिकांवर मोफत उपचार करत आहे या पार्श्वभूमीवर हि मदत त्यांनी जाहीर केली आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७७२ ने वाढून ती ७८ हजार ८२९ इतकी झाली असून २५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २५ हजार ९२२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता टाळेबंदी वाढविण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.सरकार कोरोना बाधित नागरिकांवर मोफत उपचार करत आहे या पार्श्वभूमीवर हि मदत त्यांनी जाहीर केली आहे.
सदर प्रसंगी चेतन खुबाणी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भागवत सर,रवी निकम,जाधव,विजय जोशी.डॉ.नितीन झंवर आदी मान्यवर उपस्थित होते.