क्रीडा विभाग
योगा स्पर्धेत…या तरुणाचे मोठे यश !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
थायलंड मधील बँकांकमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रँकिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोपरगाव येथील प्रज्वल आदिनाथ ढाकणे यांने दोन सुवर्ण पदक मिळवत जगाच्या नकाशावर आपले नाव उमटवत यशाला मोठी गवसणी घातली आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रज्वल ढाकणे यास याआधी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सहभागी होत अनेक बक्षीस मिळवले असून नुकतीच थायलँड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रँकिंग चॅम्पियनशिप मध्ये ट्रॅडिशनल योगासना इव्हेंट गोल्ड मेडल आर्टिस्टिक सोलो योगासना प्रकारात दोन सुवर्ण पदक मिळवले आहे.
कोपरगाव शहरातील बेट भागातील रहिवासी असलेला प्रज्वल हा एक लक्षवेधी योगा खेळाडू असून त्यांनी याआधी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत सहभागी होत अनेक बक्षीस मिळवले असून नुकतीच थायलँड येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रँकिंग चॅम्पियनशिप मध्ये ट्रॅडिशनल योगासना इव्हेंट गोल्ड मेडल आर्टिस्टिक सोलो योगासना प्रकारात दोन सुवर्ण पदक मिळवले असून बँकॉक श्री पतंजली योगा हेल्थकेअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष बी मोहम्मद जाकेरिया,बँकॉक येथील प्रेमयोग आणि आयुर्वेदा सेंटरचे रंधा नारद,बिटा सेठी,भारतीय आंतरराष्ट्रीय थ्री इयर ऑलम्पिक कमिटीचे आयोजक सेक्रेटरी एम मारिया,गोविंदराज आदिंच्या शुभहस्ते प्रज्वलचा गौरव करण्यात आला आहे.

दरम्यान प्रज्वल ढाकणे यास या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून वायएसडीए इंडियाचे संचालक विद्या हिम्मत यांचे मार्गदर्शन लाभले होते तो गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांचा मुलगा आहे.त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.