जाहिरात-9423439946
अपघात

पुन्हा…या रस्त्यावर अपघात,बालकाचा बळी,नेते,बांधकाम विभाग ढिम्मच !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   उत्तर भारतीयांना दक्षिण भारताशी जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याचे दुर्दशेचे रोज नवे अवतार समोर येत असून त्यात 23 जानेवारी रोजी एका शालेय विद्यार्थ्याचा बळी गेला असताना आज सायंकाळी पुन्हा जवळके येथील एका अंश विनोद जयस्वाल या पाच वर्षीय बालकाचा ट्रकखाली (क्रं.आर.जे.14 जी.आर.4035) बळी गेला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी,’ रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता केंव्हा करणार असा संतप्त सवाल ग्रामस्थानी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारणार असल्याचे उघड झाले आहे.

 

अपघातात मृत झालेला अल्पवीन मुलगा अंश जयस्वाल दिसत आहे.

दरम्यान आगामी वर्षी नाशिक येथे सिंहस्थ पर्वणी संपन्न होत असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 30 हजार कोटींची तरतूद केली आहे.मात्र ज्या शिर्डीच्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यांची वाट लागली आहे.त्या झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याला निधी का मिळत नाही ? त्यातील झारीतील शुक्राचार्य कोण असा संतप्त सवाल केला आहे.सार्वजनिक बांधकामा विभागाचे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता आणि त्यांचे अधिकारी मात्र जनतेची दिशाभूल करत आहेत आणि सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग निधीतून होत असल्याची खोटी बतावणी करण्यात गुंतले आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या पुरती रस्त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका बनली असून त्यात अनेक ग्रामस्थ,शालेय विद्यार्थी आणि प्रवासी यांचे बळी जात आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात भलत्याच पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात मात्र रस्ते कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था निर्माण झाली आहे.याची खंत नाही पालकमंत्री यांना आहे ना लोकप्रतिनिधी यांना आहे.सर्वच पक्ष सत्तेत सामील असताना आता दोष कोणाला देणार अशी स्थिती आहे.येथील नेते आपल्या संस्थांनासाठी निधीची तरतूद करत आहे.शिर्डीचा निधी नांदुर तळेगाव दिघे मार्गे वळवला आहे आणि दुष्काळी जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

अल्पवयीन बालकाचा बळी घेणारा हाच तो कांदा वाहतूक करणारा अवजड ट्रक.

  

दरम्यान या घटनेने जवळके येथील ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.तर या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच वाल्मीक भोसले,कौसर सय्यद,बाबासाहेब गव्हाणे,कैलास गव्हाणे,वाल्मीक नेहे,नानासाहेब नेहे,आप्पासाहेब कोल्हे आदींनी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

   दरम्यान झगडे फाटा ते वडगाव पान फाटा हा रस्ता वर्तमान काळात मृत्यूपंथ ठरला आहे.यावर शेकडो नागरिकांचे बळी जात आहे.आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय आणि राज्याचे रस्ते विकास तथा सार्वजनिक बांधकाम खाते मात्र ज्या रस्त्यांची आवश्यकता नाही त्या रस्त्यांना तरतूद करून प्रवासी आणि जनतेच्या दुःखावर मीठ चोळत आहे.त्यामुळे संतप्त ग्रामस्थानी गत महिन्यात 23 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता अंजनापूर शिवारात झालेल्या अपघातात एक अल्पवतीन मुलगा गुरुत्व कैलास गाढे याचा कंटेनर खाली मृत्यू झाला होता तर त्याचा अन्य सहकारी जखमी झाला होता.त्या घटनेच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा एकदा आज राजस्थान येथील अवजड आणि मोठ्या ट्रकने ((क्रं.आर.जे.14 जी.आर.4035) लहान मुलगा अंश विनोद जयस्वाल याला रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करून जोराची धडक दिली आहे.तो अपघात इतका भीषण होता की सदर अल्पवयीन मुलगा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाला आहे.त्याला जवळके येथील ग्रामस्थानी तातडीने राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले आहे.

भरधाव वेगाने अवजड ट्रक चालवून लहान बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हाच तो राजस्थान मधील ट्रक.

   दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी रवानगी करून त्या घटनास्थळी पंचनामा केला आहे.दरम्यान या घटनेने सदर कुटुंब पुरते हादरून गेले आहे.घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमाव जमला होता.

भरधाव वेगाने अवजड ट्रक चालवून लहान बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला हाच तो संशयित चालक.

   दरम्यान या घटनेने जवळके येथील ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.तर या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,माजी सरपंच वसंत थोरात,माजी उपसरपंच वाल्मीक भोसले,कौसर सय्यद,बाबासाहेब गव्हाणे,कैलास गव्हाणे,माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश थोरात,वाल्मीक नेहे,नानासाहेब नेहे,आप्पासाहेब कोल्हे आदींनी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close