जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अपघात

दोन कारचा अपघात,दोन जण जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-नाशिक राज्य मार्गावर देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चौफुलीवर मारुती स्विफ्ट (क्रं.एच.एच.०५ ए.एक्स.३३३४) मधील चालकाने काल सकाळी ११.४५ वाजता आपल्या ताब्यातील कार हयगयीने चालवून फिर्यादी चालक उमेश सुंदरलाल मालपाणी यांच्या मारुती वॅगनार या गाडीस मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असल्याची बातमी असून या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

  

फिर्यादी हे आपल्या काही कामानिमित्त दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता आपल्या ताब्यातील मारुती वॅगनार या मोटारीने शिर्डी येथे जात होते.दरम्यान मागील बाजूने एक मारुती स्विफ्ट हि कार आली होती.त्यावरील चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून फिर्यादी मालपाणी यांच्या मारुती वॅगनार या गाडीस जोराची धडक  दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी उमेश मालपाणी हे सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील रहिवासी असून ते आपल्या काही कामानिमित्त दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता आपल्या ताब्यातील मारुती वॅगनार या मोटारीने शिर्डी येथे जात होते.दरम्यान मागील बाजूने एक मारुती स्विफ्ट हि कार आली होती.त्यावरील चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून फिर्यादी मालपाणी यांच्या मारुती वॅगनार या गाडीस जोराची धडक  दिली आहे.त्यात फिर्यादी रुपेश मालपाणी व त्यांचा सहकारी हे दोघे जखमी झाले आहे.

  दरम्यान या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी मारुती स्विफ्ट वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा क्रं.५८६/२०२३ भा.द.वि.कलम २७९,३३७,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

  दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असून गांभीर्य समजून घेतले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close