न्यायिक वृत्त
चोरी प्रकरणी दोन आरोपी जेरबंद,कोपरगाव तालुक्यातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मोर्विस हद्दीतील सुमारे १० हजार रुपये किमतीचा पाणबुडी विद्युत पंप अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुंह्यातील आरोपी महेश भिकाजी माळी (वय-२०) व रावसाहेब सिंधू सोये (वय-२५) दोघे रा.हनुमान नगर रवंदे या दोघांना कोपरगाव तालुका पोलिसानी रवंदे येथून काल रात्री अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी महेश माळी व रावसाहेब सोये या दोन आरोपींना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर प्रथमवर्ग न्या.भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मोर्विस येथील शेतकरी श्री भाकरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकताच एक गुन्हा क्रं.२६४/२०२३ भा.द.वि कलम ३७९ अव्यये आपल्या शेतातील विहिरीतील एक अंदाजे १० हजार रुपये किमतीची एक जलपरी विद्युत पंप अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याचा गुन्हा दाखल केला होता.या बाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करत असताना त्यांना चौकशी गुप्त खबऱ्या मार्फत त्यांना खबर मिळाली की,सदर चोरी हि रवंदे येथील चोरट्यांनी केली असल्याची खबर मिळाली होती.त्यानुसार तालुका पोलिसांनी चोरट्यांच्या राहत्या ठिकाणी काल रात्री १०.३० धाड टाकली होती.त्यात त्यांनी आरोपी महेश भिकाजी माळी व रावसाहेब सिंधू सोये या दोघाना जेरबंद केले आहे.या साठी पोलीस हे.कॉ.संदीप बोटे,पो.कॉ.जयदीप गवारे,रशीद शेख,युवराज खुळे आदिनीं हि कामगिरी केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान पोलिसानी या प्रकरणी महेश माळी व रावसाहेब सोये या दोन आरोपींना कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर प्रथमवर्ग न्या.भगवान पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.