जाहिरात-9423439946
निवड

कोपरगाव तालुक्यातील…या सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारी सोसायट्यांमध्ये राजकीयदृष्टया महत्वाच्या असणाऱ्या मढी खुर्द विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी काळे गटाचे सुधाकर कुऱ्हाडे व उपाध्यक्षपदी प्रकाश आभाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मढी खुर्द सेवा संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सुधाकर माधवराव कुऱ्हाडे व उपाध्यक्षपदासाठी प्रकाश संतु आभाळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र रहाणे यांनी अध्यक्षपदी सुधाकर कुराडे उपाध्यक्षपदी प्रकाश आभाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.

मढी खुर्द सोसायटीची निवडणूक मागील महिन्यात नेहमीप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे.या सोसायटीवर मागील अनेक वर्षापासून काळे गटाची सत्ता आहे.या सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून अध्यक्षपदासाठी सुधाकर माधवराव कुऱ्हाडे व उपाध्यक्षपदासाठी प्रकाश संतु आभाळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र रहाणे यांनी अध्यक्षपदी सुधाकर कुराडे उपाध्यक्षपदी प्रकाश आभाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.सचिव संजय दिघे यांनी त्यांना सहकार्य केले आहे.

यावेळी काळे गटाचे ज्येष्ठ नेते श्रीधर आभाळे,मोहनराव आभाळे,सोपानराव गवळी,भाऊसाहेब कुऱ्हाडे,उत्तमराव कुऱ्हाडे,वसंतराव आभाळे,दत्तात्रय गवळी,नवनिर्वाचित संचालक विजूनाना आभाळे,साहेबराव आभाळे,सुहास आभाळे,विजय आभाळे,अजय गवळी,एकनाथ आभाळे, शंकर आभाळे,सुखदेव भागवत,पोपटराव गोसावी,पुष्पा आभाळे,गयाबाई गवळी आदी मान्यवरांसह सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष कुऱ्हाडे व उपाध्यक्ष आभाळे यांचे माजी आ.अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close