जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

प्रवरा बँक निवडणूक अधिकाऱ्यांना,आयुक्तांची कारणे दाखवा नोटीस

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अ.नगर जिल्ह्यातील सहकारातील अग्रणी असलेल्या प्रवरा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या दि.१५ मे च्या छाननीत शेतकरी विकास पॅनलचे ११ उमेदवारी अर्ज अकारण बाद केले होते या निर्णया विरुद्ध पुणे येथील सहकार आयुक्त यांचे कडे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपील दाखल केले असून त्या बाबत सहकार आयुक्तांनी नोटिसा काढल्या असल्याची माहिती शिवाजी जवरे यांनी दिली आहे.या प्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी काम पाहिले असून असल्याची माहिती जवरे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

सदर प्रवरा बँक निवडणुकीत एकूण ४४ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यापैकी जवरे यांनी ३२ उमेदवारी अर्जावर मुळा प्रवरा इलेक्ट्रिक कॉ.ऑप.सोसायटी यांची व हरकत घेतलेल्या प्रत्येकी अर्जावर त्या गावातील विकास सेवा संस्थेची यांची थकबाकी असल्याची हरकत नोंदवली होती.त्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता ३२ उमेदवारी अर्ज मंजुर करण्यात आले असल्याचा आरोप केला होता.उर्वरित शेतकरी विकास पॅनलचे ११ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले होते.

अ.नगर जिल्ह्यातील सहकारातील अग्रणी असलेल्या प्रवरा सहकारी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक सुरु असून या निवडणुकीत दाखल झालेले नामनिर्देशन अर्ज छाननीं दि.१५ मे रोजी संपन्न झाली आहे.यात शेतकरी संघटनेच्या परिवर्तन मंडळाचे शिवाजी रामचंद्र जवरे,विठ्ठल मारुती गायकवाड,भाऊ गेनू भुसाळ,बाबासाहेब अण्णासाहेब तांबे,अनिल भास्कर थेटे,सुजाता रणजित आहेर,दत्तात्रय किसन खर्डे,मंगलाबाई विठ्ठल गायकवाड,सुजाता रणजित आहेर,अनिल भास्कर थेटे,किसन हनुमंत होडगर या ११ उमेदवारी अर्जावर विरोधी दुसऱ्या ११ उमेदवारांनी शेअर्स व ठेव अपुरी असल्याचे कारण देऊन कुठल्याही पुराव्या अभावी लेखी हरकत घेतली होती व विरोधकांचे अर्ज नामंजूर केले होते.त्यामुळे विरोधी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दुखावले होते.त्या विरोधात त्यांनी सहकार आयुक्त यांचेकडे अपील केले होते.

सदर निवडणुकीत एकूण ४४ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यापैकी जवरे यांनी ३२ उमेदवारी अर्जावर मुळा प्रवरा इलेक्ट्रिक कॉ.ऑप.सोसायटी यांची व हरकत घेतलेल्या प्रत्येकी अर्जावर त्या गावातील विकास सेवा संस्थेची यांची थकबाकी असल्याची हरकत नोंदवली होती.त्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता ३२ उमेदवारी अर्ज मंजुर करण्यात आले असल्याचा आरोप केला होता.उर्वरित ११ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. विरोधी ११ उमेदवारांनी बँक खात्याची माहिती हजर केली होती.सदर बँकेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करत दुसऱ्या व्यक्तींच्या बँक खात्याची माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान सदर आरोपात पुणे येथील सहकार आयुक्त,यांनी न निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राहाता,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवरा सहकारी बँक,लोणी व सर्व हरकतदार यांना नोटीस काढण्याचे आदेश पारित केले आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.याकामी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अड्.अजित काळे यांनी काम पहिले आहे.तर त्यांना अड्.साक्षी काळे यांनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close