जाहिरात-9423439946
शैक्षणिक

समता पॅटर्न द्वारा विद्यार्थ्यांना अनेक संधी-…यांचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नजीक असलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या आयुष्याला शिस्तबद्ध दिशा देण्याचे काम करत असून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सहली,वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करुन बाहेरील जगाशी सांगड घालण्याचा प्रयत्न सतत चालू असल्याचे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रगतीत शिक्षकांसोबतच कोयटे परिवाराचे योगदान मोठे आहे.ते समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवत आहेत.त्यांनी लावलेल्या शिस्तीचा अवलंब करून समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा प्रत्येक क्षेत्रात उभारावा”-रामराव ढिकले,पोलीस निरीक्षक,कोपरंगाव शहर पोलीस ठाणे.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या इ.१० वी व इ.१२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे,समता स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”समताच्या गुणवंत विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे पालक ही गुणवंत आहे.त्यांनी या स्पर्धेच्या युगात पाल्यावर आपल्या जास्त अपेक्षा न लादता त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सहकार्य करावे.विद्यार्थ्यांनी सामाजिक संकेतस्थळाच्या आहारी न जाता,त्या आभासी जगापासून दूर राहणे गरजेचे आहे.शिक्षणासाठी विविध मार्ग आहेत.योग्य मार्गदर्शन घेऊन ते निवडावे.समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रगतीत शिक्षकांसोबतच कोयटे परिवाराचे योगदान मोठे आहे.ते समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवत आहेत.त्यांनी लावलेल्या शिस्तीचा अवलंब करून समता इंटरनॅशनल स्कूलचा झेंडा प्रत्येक क्षेत्रात उभारावा.

सदर प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या हर्षलता शर्मा यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन सुहासिनी कोयटे,स्वाती कोयटे,बाबासाहेब बेरगळ यांनी केले आहे.तर सुत्रसंचालन शाद जलीस यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार शिक्षिका सारीका अग्रवाल यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close