निवडणूक
अंजनापुरच्या सरपंचपदी कविता गव्हाणे तर उपसरपंचपदी अशोक गव्हाणे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील राजकियदृष्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अंजनापुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या कविता अशोक गव्हाणे यांची तर उपसरपंचपदी भाजपचे अशोक आनंदराव गव्हाणे यांची निवड झाली आहे.याठिकाणी राज्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध फाटलेले असताना मात्र येथे भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे हे विशेष !
विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी शोभा यशवंत गव्हाणे यांचा तर उपसरपंचपदा साठी विवेक बाबासाहेब गव्हाणे यांनी अर्ज दाखल केले होते त्यांना तीन मते मिळाली तर निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना चार मते मिळून ते निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले आहे.
नूतन सरपंच कविता गव्हाणे यांच्या नावाची सुचना ग्रामपंचायत सदस्य आशाबाई गव्हाणे यांनी मांडली होती तर अशोक गव्हाणे यांच्या नावाची सुचना ग्रामपंचायत सदस्य अनिता गव्हाणे यांनी मांडली होती.विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी शोभा यशवंत गव्हाणे यांचा तर उपसरपंचपदा साठी विवेक बाबासाहेब गव्हाणे यांनी अर्ज दाखल केले होते त्यांना तीन मते मिळाली तर निवडून आलेल्या सरपंच व उपसरपंच यांना चार मते मिळून ते निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सुर्यकांत थोरात यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक भाऊसाहेब कार्ले यांनी त्यांना सहकार्य केले आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी पंचायत समिती सदस्य नानासाहेब गव्हाणे,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रंगनाथ गव्हाणे यांनी अभिनंदन केले आहे.