जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी आधी दुष्काळी गावांना द्या-..या संघटनेची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे असून याबाबत सरकारने मराठवाड्यास पाणी देण्यास सुरुवातीला नव्वद हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असून यात नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावांचा साधा विचार केलेला नाही त्यामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या आणि निळवंडेत कमी पाणी असलेल्याआणि भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना अग्रक्रमाने पाणी द्यावे अशी महत्वपूर्ण मागणी आज निळवंडे कालवा कृती समिती आणि शेतकरी संघटनेने उर्ध्व प्रवरा-२ (निळवंडे) धरणाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे एक निवेदन देऊन केली आहे.या मागणीचे दुष्काळी शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी नगर-नाशिक जिल्ह्यातील वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या आणि निळवंडेत कमी पाणी असलेल्या आणि भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना अग्रक्रमाने पाणी द्यावे ही मागणी करताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते.

“संगमनेर तालुक्यातील या लढ्यात सामील असलेल्या चिंचोली गुरव गावातील ३०२ हे.सह निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या तळेगाव दिघे,तीगाव,निळवंडे,करुले,कौठे कमलेश्वर,मेंढवण आदी गावांना सौर उपसासिंचन योजनेद्वारे निळवंडे धरणाचे पाणी देण्यात यावे अशी मागणी करून याबाबत जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल” -रूपेंद्र काळे,अध्यक्ष,निळवंडे कालवा कृती समिती, अ.नगर-नाशिक.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की,”शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे व सचिव रुपेंद्र काले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (छत्रपती संभाजीनगर) दोन वर्षापूर्वी केलेल्या जनहित याचिकेची (क्रं.-०५/२०२४) मागील वर्षी सुनावणी झाली होती.यात न्या.मंगेश पाटील व न्या.प्रफुल्ल कुबाळकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली होती.गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे.त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध वाद राज्याला सर्वश्रुत आहे.तर उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील उत्तर कोकणातील नार-पार,अंबिका औरंगा दमणगंगा,वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टी.एम.सी.अतिरिक्त पाणी शिल्लक आहे.पश्चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २००१ व २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.

उर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे अधिकारी प्रदीप हापसे,अमोल कवडे,उपकार्यकारी अभियंता कुणाल चोपडा यांचेशी चर्चा केल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते.

शेतकरी संघटनेच्या जनहित याचिकेनंतर (०५/२०२४) उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे वितरण करताना सरकारला निळवंडेच्या दुष्काळी १९० गावांशिवाय भोजापूर या १३.०२ द.ल.घ.मी.क्षमतेच्या छोट्या प्रकल्पातील जवळपास सिन्नर तालुक्यातील १० तर संगमनेर तालुक्यातील १० गावे असे व एकूण २० गावांचा सरकारला विसर पडला आहे.त्यामुळे या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील माळवाडी,दूषिंगवाडी,दातली,दोडी,नांदुर शिंगोटे,खंबाळे,पांगरी,चास,भोकणी,सुरेगाव आदी १० गावे तर संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव,पिंपळे,सोनेवाडी,पारेगाव खू.पारेगाव बुद्रुक,वडझरी खू,वडझरी बुद्रुक,सोनोशी,पोखरी,काकडवाडी आदी १० गावांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

   दरम्यान या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार,दमणगंगा,वैतरणा,उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे;तसेच उपसा नदीजोड,वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टी.एम.सी.पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे.यात प्रवरा खोऱ्यातील घाटघर जवळील हिवरा नाला तसेच साम्रद गावाजवळील साम्रद नाला येथे वळण बंधारे बांधून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वकडे वळविण्याची योजना आहे.त्याला कालवा कृती समितीच्या मागणींनुसार महाआघाडीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गती दिली होती.त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला होता.या बंधाऱ्याद्वारे एकूण १२८७ दशलघफूट अतिरिक्त पाणी वळविणे शक्य होणार असून त्याचा निळवंडे प्रकल्पासाठी फायदा होणार आहे.तर उर्ध्व प्रवरा खोऱ्यात एकूण एकूण १५ टी.एम.सी.पाणी उपलब्ध होणार आहे.त्यासाठी निळवंडे कालवा कृती समिती व शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांचे विधी सहाय्याने पत्रकार नानासाहेब जवरे व रूपेंद्र काले यांचे नावाने दोन वर्षापूर्वी निळवंडे सारखी जनहित याचिका दाखल केली होती.शिवाय शेतकरी संघटना आणि गोदावरी खोऱ्यातील शेतकरी यांनी कोपरगाव येथे एकत्र येत या पाण्यासाठी संघर्ष समिती स्थापन केली आहे.त्याची सुनावणी मागील वर्षी दि.२८ जानेवारी २०२५ रोजी झाली होती.यात उच्च न्यायालयाचे न्या.मंगेश पाटील व न्या.प्रफुल्ल कुबाळकर यांचेसमोर ही सुनावणी पार पडली होती.त्यावेळी उर्ध्व गोदावरी खोरे जल पुनर्स्थापना संघर्ष समिती नगर-नाशिकच्यावतीने ॲड.काळे यांनी युक्तिवाद केला तर सरकारी पक्षाचेवतीने अभियोक्ता सुरासे यांनी आपली बाजू मांडली त्यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकार गोदावरी खोरे मराठवाडा विकास महामंडळास ही नोटीस बजावली होती.त्याची पुढील सुनावणी लवकरच संपन्न होणार आहे.या पार्श्वभूमीवर सरकारला जाग आली असून त्यांनी उर्ध्व गोदावरी खोऱ्यासाठी पहिल्या टप्प्यात ९० हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.तशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.मात्र त्यात केवळ मराठवाडा विभाग सरकारने डोळ्यासमोर ठेवला आहे.मात्र नगर जिल्ह्यातील शतकानुशतके दुष्काळी असलेल्या अहिल्यानगर आणि नाशिकच्या पूर्वेकडील दुष्काळी १९० गावांचा सरकारला विसर पडला असल्याचे दिसून आले आहे.शिवाय भोजापूर या १३.०२ द.ल.घ.मी.क्षमतेच्या छोट्या प्रकल्पातील जवळपास सिन्नर तालुक्यातील १२ तर संगमनेर तालुक्यातील १० गावे असे व एकूण २२ गावे उपेक्षित ठेवली आहे.त्या गावांचे नाव घेण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील कोणीही नेता तयार असल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील माळवाडी,दूषिंगवाडी,दातली,दोडी,नांदुर शिंगोटे,खंबाळे,पांगरी,चास,भोकणी,सुरेगाव आदी १० गावे तर संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव,पिंपळे,सोनेवाडी, पारेगाव खू.,पारेगाव बुद्रुक,वडझरी खु.,वडझरी बुद्रुक,काकडवाडी,करुले,सोनोशी,पोखरी आदी १० गावांत मोठा असंतोष निर्माण झाला आहे.त्यामुळे या गावांना कोणी वाली आहे की नाही असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे आज शेतकरी संघटना आणि  निळवंडे कालवा कृती समिती यांनी संयुक्तपणे आज निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे,कालवा विभागाचे अभियंता अमोल कवडे यांची भेट देऊन त्यांना निवेदन दिले आहे.त्यात त्यांनी पश्चिमेचे पाणी आधी या निळवंडे धरणाचे लाभक्षेत्रातील दुष्काळी १९०गावे व भोजापूर धरणाचे खालील २० गावे अशा २१० तुषार्थ गावांना सदर पाणी आरक्षित करावे अशी महत्वपूर्ण मागणी केली आहे.

  सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,शेतकरी संघटनेचे सचिव रूपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,संघटक नानासाहेब गाढवे,उत्तमराव जोंधळे,तानाजी शिंदे,भाऊसाहेब शिंदे,भाऊसाहेब सोनवणे,प्रकाश सोनवणे,बाळासाहेब सोनवणे,सौरभ शेळके,न्यानदेव शिंदे,रावसाहेब मासाळ,दिनकर चासकर,अशोक गांडोळे,विलास सोनवणे,सुधाकर शिंदे,भिवराज शिंदे,नंदू भडांगे,सुभाष सोनवणे आदिसंह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.दरम्यान या मागणीबद्दल वर्षानुवर्ष दुष्काळी असलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  दरम्यान यावेळी शेतकऱ्यांनी संगमनेर तालुक्यातील या लढ्यात सामील असलेल्या चिंचोली गुरव गावातील ३०२ हे.सह निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातून वगळलेल्या तळेगाव दिघे,तीगाव,निळवंडे,करुले,कौठे कमलेश्वर,मेंढवण आदी गावांना सौर उपसासिंचन योजनेद्वारे निळवंडे धरणाचे पाणी देण्यात यावे अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले यांनी केली आहे.याबाबत जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close