अर्थकारण
महागाईवाढीत किरकोळ घट, रेपोरेट वाढणार?

न्यूजसेवा
मुंबईः
जूनमधील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर ७.०१ टक्के झाला आहे. मे महिन्यात हाच दर ७.०४ टक्के होता तर एप्रिलमध्ये हा दर ७.७९ टक्के होता. म्हणजेच हळूहळू किरकोळ महागाई दर खाली येत आहे. अर्थात महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे.
जून महिन्याचा आकडा मागील महिन्याच्या तुलनेत कमी झाला असला तरी अजूनही उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत ऑगस्टच्या पतधोरण बैठकीत पुन्हा रेपो दरात वाढ करण्याचा विचार होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
एकीकडे केंद्र सरकार महागाई कमी करण्यासाठी सातत्याने मार्ग शोधत आहे. दरम्यान, जून महिन्यात महागाईचा दर कमी झाला. अर्थात सरकारने केलेल्या सर्व उपाययोजना असूनही महागाईचा दर रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा अजूनही जास्त आहे.
सलग सहा महिने, किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे. या वेळीदेखील हा आकडा रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा १.१ टक्क्यानेअधिक आहे. जून महिन्याचा आकडा मागील महिन्याच्या तुलनेत कमी झाला असला तरी अजूनही उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत ऑगस्टच्या पतधोरण बैठकीत पुन्हा रेपो दरात वाढ करण्याचा विचार होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.