गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग,गुन्हा दाखल !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस नुकतेच महविद्यालयातून घरी जात असताना एका आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला छोटया हत्तीतून येऊन,” तुला घरी सोडतो” असे म्हणून बळजबरीने फिर्यादी मुलीचा हात पकडुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी शहर पोलिसांत आरोपी निरंजन पंडोरे याचे विरुध्द गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यातील पीडित अल्पवयीन (वय-१६) महाविद्यालयीन तरुणी असून ती रोज आपल्या घरून महाविद्यालयात जात येत असते याचा गैरफायदा घेऊन आरोपी निरंजन पंडोरे याने तीं सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असताना तिचा आरोपी पंडोरे याने छोटा हत्ती या चार चाकी वाहनाच्या सहाय्याने पाठलाग करून हा विनयभंग केला आहे.
लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स’ म्हणजेच पोक्सो कायदा अस्तित्वात आला आहे.यात २०१२ साली केंद्र सरकारनं बालकांविरोधात अत्याचारासाठी कठोर शासन करण्यासाठी कायदा अंमलात आणला होता.कायद्यात तरतुदी अशा आहेत,ज्यात वय वर्ष १८ किंवा त्याहून खाली असावा,सोबतच मुलगा किंवा मुलगींना कायदा समान आहे,यात किमान शिक्षा १० वर्षांची आहे.बालक जर १६ वर्षाखाली असेल तर किमान शिक्षा २० वर्षांची आहे,तर सर्वाधिक ही देहदंड आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते अशा तरतुदी आहे.असे असताना अद्याप असे गुन्हे कमी होताना दिसत नाही हे मोठे दुर्दैव असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून यातील पीडित अल्पवयीन मुलगी (वय-१६) महाविद्यालयीन तरुणी असून ती रोज आपल्या घरून महाविद्यालयात जात-येत असते याचा गैरफायदा घेऊन आरोपी निरंजन पंडोरे याने तीं सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात असताना तिचा आरोपी पंडोरे याने छोटा हत्ती या चार चाकी वाहनाच्या सहाय्याने पाठलाग करून तिला,” तुला घरी सोडतो’ असे म्हणून बळजबरीने फिर्यादी तीचा हात पकडुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला आहे.
या प्रकरणी तिने कोपरगाव शहर पोलिसांत ठाण्यात तिने आरोपी निरंजन पंडोरे याचे विरुध्द गुन्हा क्रं.२१४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८(१),७४सह बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे दाखल केला आहे.घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करीत आहे.