जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वाहन विक्री

सेकंड हँड’ कार विक्रीत लक्षणीय वाढ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

नवी दिल्ली :

सेकंड हँड कार्सच्या विक्रीतला एक नवा खेळाडू असलेल्या ‘स्पिनी’ने २०२२ च्या दुसर्‍या तिमाहीत ‘सेकंड हँड कारविक्री’च्या बाबतीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. ‘स्पिनी’च्या दुसर्‍या तिमाहीतल्या अहवालानुसार ५७ टक्के कार वापरकर्ते प्रथमच कार खरेदी करणारे आहेत. या अहवालात सेकंड हँड कारच्या खरेदी आणि विक्रीमधील काही रंजक ट्रेंड्सवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘सेकंड हँड’ कार उद्योगात संपर्करहित खरेदी आणि विक्रीच्या वाढत्या मागणीमुळे ‘स्पिनी’ने ४४ टक्के डिजिटल व्यवहारांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे दुसर्‍या तिमाहीत कार खरेदी करणार्‍यांमध्ये महिलांचा वाटा ३२ टक्के होता.

ह्युंदाई आणि होंडा ग्राहकांची पहिली पसंती आहेत. हॅचबॅक कार्स सर्वात लोकप्रिय आहेत. त्यानंतर सेदान आणि एसयूव्ही येतात. ह्युंदाई एलाईट २०, ग्रँड आय टेन आणि मारुती सुझुकी बलेनो ही ग्राहकांमध्ये सर्वाधिक पसंतीची कार मॉडेल्स आहेत.

‘स्पिनी’वरील कार खरेदी करणारे बहुतेक ३० ते ४० वयोगटातले आहेत. वैयक्तिक वाहतुकीची वाढती मागणी, आर्थिक कारणं आणि सेकंड हँड कार्सची वाढती स्वीकृती अशा अनेक कारणांमुळे सेकंड हँड कार्सची मागणी वाढली आहे. ‘स्पिनी’च्या मते सेकंड हँड कारमालकांना कार्यक्षम आणि विश्‍वासार्ह सेवा अपेक्षित आहे. ब्रँडबद्दल बोलायचं झाल्यास मारुती सुझुकी,ह्युंदाई आणि होंडा ग्राहकांची पहिली पसंती आहेत. हॅचबॅक कार्स सर्वात लोकप्रिय आहेत. त्यानंतर सेदान आणि एसयूव्ही येतात. ह्युंदाई एलाईट २०, ग्रँड आय टेन आणि मारुती सुझुकी बलेनो ही ग्राहकांमध्ये सर्वाधिक पसंतीची कार मॉडेल्स आहेत.

रंगांबद्दल बोलायचं झाल्यास ‘स्पिनी’चे खरेदीदार पांढर्‍या, राखाडी आणि सिल्व्हर रंगाच्या कारना प्राधान्य देत आहेत. वैयक्तिक वाहतुकीची वाढती मागणी, आर्थिक कारणं, सेकंड हँड कारची वाढती स्वीकृती ही कारविक्री वाढण्यामागील कारणं आहेत. दुसर्‍या तिमाहीतल्या ‘स्पिनी’च्या ट्रेंडवर भाष्य करताना ‘स्पिनी’चे संस्थापक आणि ‘सीईओ’ नीरज सिंग म्हणाले, ‘आज कार ही लक्झरी नसून देशाच्या शहरी भागात एक गरज बनली आहे. ‘स्पिनी एक्सट्राकेअर’च्या दृष्टीने ‘होम डिलिव्हरी’ आणि ‘होम टेस्ट ड्राईव्ह’च्या वचनबद्धतेनुसार ‘सेकंड हँड’ कारसाठी खात्रीशीर डिझाइनसह गुणवत्ता सुनिश्‍चित करता येते. कार खरेदीदारांसोबत दीर्घकाळ टिकणारे संबंध निर्माण करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आकडे दाखवतात की, आम्ही आमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. देशातल्या प्रत्येक कुटुंबाला उच्च दर्जाच्या कार उपलब्ध करून देणं ही आमची जबाबदारी आहे. देशातल्या तरुणांचा लक्झरी वाहनांकडे वाढता कल पाहता ‘स्पिनी’ने नुकताच लक्झरी सेगमेंट लॉंच केला आहे. ५०० हून अधिक कार आणि २५० शहरांमध्ये डिलिव्हरी सेवेसह ‘स्पिनी’ने महानगरांमध्ये विशेषतः ३१ ते ४५ वर्षे वयोगटातल्या ग्राहकांमध्ये वाढ नोंदवली आहे.

जाहिरात-9423439946

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close