दळणवळण
वाकडी मार्गे शिर्डी-शिंगणापूर रस्त्याची लागली वाट,आंदोलनाचा इशारा

न्यूजसेवा
वाकडी (प्रतिनिधी ):
राहाता तालुक्यातील वाकडी गावातून श्रीरामपूर कडे जाणाऱ्या वाकडी दत्तनगर श्रीरामपूर एम.आय.डी.सी. भागातून पुढे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून पायी प्रवास करणे सुद्धा मुश्किल झाले असल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वाकडी ग्रामस्थांनी केली आहे.
वाकडी मार्गे शिर्डी शिंगणापूर रस्ता हा फक्त महामार्ग म्हणून वर्तमानात नावापुरता उरला आहे.अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.रोजची या रस्त्यावरून शेकडो दुचाकी व शेकडो चारचाकि वाहनांची वर्दळ करत असते.त्यांना या मार्गावरून यमयातना सहन कराव्या लागत आहे. प्रवाशी वर्गात या अत्यंत खराब रस्त्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे.
वाकडी मार्गे शिर्डी शिंगणापूर रस्ता हा कित्येक वर्ष पासून महामार्गाच्या नावाखाली प्रलंबीत आहे.साई संस्थानने हा रस्ता मध्यंतरी मजबुती साठी आराखढ्यात घेतला होता परंतु पुढे काही अज्ञात करणास्तव हा रस्ता यादीतून सही विना प्रलंबीत राहिला.जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हा रस्ता मजबूत होणे साठी वर्ग होणे कामी अनेक वेळा अर्ज व प्रस्ताव देखील सादर झाले मात्र अद्याप हा महत्वपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाला नाही कि मोठा निधी मंजूर झाला नाही.
वाकडी मार्गे शिर्डी शिंगणापूर रस्ता हा फक्त महामार्ग म्हणून वर्तमानात नावापुरता उरला आहे.अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.रोजची या रस्त्यावरून शेकडो दुचाकी व शेकडो चारचाकि वाहनांची वर्दळ करत असते.त्यांना या मार्गावरून यमयातना सहन कराव्या लागत आहे. प्रवाशी वर्गात या अत्यंत खराब रस्त्यामुळे मोठी नाराजी पसरली आहे.मध्यंतरी या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून डागडुजी केली मात्र निकृष्ट व धातूरमातुर दुरुस्ती केली होती.मात्र अल्पावधीतच हा मार्ग पून्हा खड्डेमय झाला आहे.दतनगर वाकडी रस्त्यावरील एम.आय.डी.सी.परिसरात अनेक कारखानदारांच्या अवजड वाहणामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे.वाकडी श्रीरामपूर रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून दर्जाहीन काम होत आहे.या रस्त्यावर वाकडी येथील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र खंडेराय देवस्थान मंदिर असून या भागातील अत्यंत खराब रस्त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.वाकडी ते धनगरवाडी हा परिसर कोपरगाव मतदार संघात असून धनगरवाडी ते दत्तनगर फाटा हा परिसर श्रीरामपूर मतदार संघात आहे.तरी हा अत्यंत खराब व निकृष्ट रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाकडी ग्रामस्थांनी शेवटी दिला आहे.