कोपरगाव तालुका
कोपरगावात विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या-दखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर पायाभूत सुविधा आवश्यक आहे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कारवाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“मतदार संघातील अनेक रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.अनेक रस्ते माजी आ. अशोक काळे यांच्या कार्यकाळात झाले आहे. त्यानंतर हे रस्ते दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या रस्त्यांचा विकास खुंटला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन हा निधी मिळवला आहे”-आ.आशुतोष काळे.
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे राज्या मार्ग क्रं. ७ ते कारवाडी जिल्हा परिषद शाळा पर्यतच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते.
सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे,अशोक तिरसे,काकासाहेब ताम्हाणे,वसंतराव दंडवते,राहुल जगधने,सरपंच रुपाली माळी,उपसरपंच दिगंबर कोकाटे,भिकाजी सोनवणे, दिलीप पायमोडे,श्रीराम राजेभोसले,देवराम गावंड,अशोकराव मोरे, विक्रम कोकाटे,रोमेश बोरावके,नामदेव खुळे, प्रदीप जाधव,किसनराव सोनवणे, निरंजन बनकर,अनिल खरे,सचिन क्षिरसागर अभियंता उत्तम पवार,राजेंद्र दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मतदार संघातील अनेक रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.अनेक रस्ते माजी आ. अशोक काळे यांच्या कार्यकाळात झाले आहे. त्यानंतर हे रस्ते दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या रस्त्यांचा विकास खुंटला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविला असून रस्त्यांची कामे सुरु आहेत.नागरिकांनी रस्त्याच्या बाजूने साईड गटार राहतील याची काळजी घ्यावी जेणेकरून रस्ता खराब होणार नाही यासाठी प्रयत्न करावे”असे आवाहन शेवटी केले आहे.