तंत्रज्ञान
विज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी शोध लावावे -डॉ.आहेर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विज्ञान ,तंत्रज्ञान व अनुविज्ञान अशा गोष्टींची सांगड या विज्ञान प्रदर्शनातून घालून दिल्याने. आत्मा मालिक येथून आपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन सोबत घेवून जात आहोत. देश व समाजाच्या प्रगतीसाठी असणारे शोध विज्ञानाच्या माध्यमातून लावावे असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉक्टर विजय आहेर यांनी कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या परिसरात ४५ वे राज्यस्तरीय राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध जिल्ह्यातून ९०० विद्यार्थी- शिक्षकांनी आपल्या विविध उपकरणाच्या माध्यमातून सहभाग नोंदविला होता. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनांमध्ये नंदुरबारच्या सोमेश महेश जोशी हा सर्वाधिक गुण मिळवून चॅम्पियनशिप सह प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला आहे.
मुंबई येथील डॉ. होमी भाभा अनुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.विजय आहेर, अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे ,शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रवींद्र रमतकर, मनिषा भडंग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेरचे प्राचार्य डॉ. अचला जडे, , आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य निरंजन डांगे, सुधाकर मलिक, नितीन सोनवणे, रमेश कालेकर, सचिन डांगे, आदी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी जगन्नाथ भोर मार्गदर्शन करताना म्हणाले की
यावेळी जगन्नाथ भोर मार्गदर्शन करताना म्हणाले की
, आत्मा मालिक ध्यानपीठाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण विज्ञान व अध्यात्माची सांगड घालण्याचे काम येथे केले जाते. माणसाला व समाजाला एखाद्या गोष्टीची गरज भासली तर ती गरज सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास नवा शोध लागतो. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच सामाजिक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून मुलांना चालना मिळते असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की
याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की, तब्बल तीस वर्षाच्या कालखंडानंतर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्याचे यजमानपद अहमदनगर जिल्ह्याला मिळाले, त्यातही परम पूज्य आत्मामालिक माऊलींच्या सानिध्यात पावन झालेल्या कोपरगावच्या या भूमीत ते संपन्न झाले याचे समाधान वाटते.
राज्यस्तरीय विज्ञान – गणित प्रदर्शनांमध्ये राज्यातील ९०० विद्यार्थी – शिक्षकांनी ३६५ उपकरणांची मांडणी पाच गटांमध्ये केली होती. त्यापैकी डी.आर. जुनियर कॉलेज नंदुरबार चा सोमेश महेश जोशी याने माध्यमिक विद्यार्थी गटामधून भूमिती सोबत खेळ या उपकरणातून सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. किरण सुनील कावळे, म.गा. विद्यालय व ज्युनियर कॉलेज उंब्रज जि. सातारा. याने द्वितीय क्रमांक, प्राची धाकु मेस्त्री, प्रगत विद्यामंदिर रामगड तालुका मालवण जि.सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्राथमिक विद्यार्थी गटामधून इंदिरा पाटील विद्या मंदिर चाकुर जि. लातूर चा नरेंद्र बालाजी वाघमारे प्रथम. नूतन इंग्लिश स्कूल ब्राह्मणगाव जि. नाशिक ची पल्लवी सुदाम डांगर द्वितीय तर हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय आष्टी जि. वर्धा ची फाल्गुनी दरोकर तृतीय. आदिवासी प्रकल्प माध्यमिक गटातून सर्वोदय विद्या मंदिर राजूर जि. अहमदनगर येथील हर्षद वाळे तर प्राथमिक गटातून जि.प. शाळा तळेगाव जि. यवतमाळ श्रृती सहारे हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रयोगशाळा परिचर गटांमध्ये – महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय जळगाव चे ऋषिकेश विजय पाटील प्रथम, डी एस हायस्कूल सायन मुंबई चे राजेश सरोदे द्वितीय. माध्यमिक शिक्षक गटातून – कान्होजी विद्यालय काळभोर जि. पुणे चे रावसाहेब चौधरी प्रथम, गांधी विद्यालय आर्वी जि. वर्धा चे रोशन शेख द्वितीय. प्राथमिक शिक्षक गटामधून- परशुराम नायडू विद्यालय बोरगाव मंच जि. अकोला चे विजय यशवंत पजई प्रथम. तर महेश विद्यालय शिरूर जि. लातूरचे अमोल अर्जुनराव परतवाघ द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सामील होण्याचा मान मिळणार आहे. दरम्यान पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मनीषा भडंग यांनी केले. तर विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले परीक्षक ,विद्यार्थी, शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या व्यवस्थेबद्दल आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजका बद्दल ऋण व्यक्त केले. या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, शबाना शेख, राजेंद्र पवार, विनय लाळगे, धनंजय भोर ,यांची उपस्थिती होती. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे विभाग प्रमुख अशोक कांगणे, बाळासाहेब कराळे, रवींद्र देठे, अनिल सोनवणे, सुनील पाटील, किशोर कटारे, विश्वास बारवकर, भगवान शेळके, भगवान सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.