जाहिरात-9423439946
Uncategorized

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये परीक्षार्थ्यांना उत्साहात निरोप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

धावपळीच्या व बदलत्या विज्ञान युगात मुलांवरील ताण व परीक्षांचे असणारे दडपण हे वाढतच असून विद्यार्थी देखील परीक्षांना न घाबरता सामोरे न जाता ताणतणावात परिक्षा देत असतात. नुकत्याच सीबीएसईच्या १० वी, १२ वी च्या बोर्डाच्या परिक्षा चालू झाल्या आहेत. समता इंटरनॅशनल स्कूलला देखील २०१९-२० वर्षापासून सीबीएसई बोर्डाकडून परिक्षा केंद्राची मान्यता मिळाली असल्याने मुलांच्या १०वी, १२ वी च्या परीक्षार्थींचे गुलाबपुष्प आणि कॅटबरी देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे त्यांच्या मनावरील ताण कमी होत असून नि:संकोचपणे परिक्षा देण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दाखविली.’ अशी माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांनी दिली आहे.

या प्रसंगी सीबीएसई पुरस्कृत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल शैक्षणिक संकुल व संजीवनी अकॅडमीतील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसह सीबीएसई अंतर्गत इतर शाळेतील विद्यार्थी परीक्षार्थी म्हणुन परिक्षा देत आहे. ‘मनावरील ताण, दडपण कमी होण्यासाठी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देणे’ हा उपक्रम पाहून विद्यार्थी देखील भारावून गेले होते. कोपरगाव शहरातील परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देण्याचा उपक्रम हा कोपरगाव तालुक्यात समता इंटरनॅशनल स्कूल पहिल्यांदाच राबवत असून पालक वर्गाकडून उपक्रमाचे कौतुक होत आहे.

समता स्कूलमध्ये परीक्षार्थी म्हणुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, विश्वस्त संदीप कोयटे शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांचे उपस्थितीत स्कूलमधील शिक्षक–शिक्षिका विद्यार्थ्यांचे स्वागत करत होते. उपक्रम यशस्वितेसाठी समता स्कूलचे उपप्राचार्य विलास भागडे, उपप्राचार्या शैला झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहे. प्रत्येक पेपरच्या दिवशी समता इंटरनॅशनल स्कूल हा उपक्रम राबवत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close