जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेचा ५३.७४ लाख रुपयांचा शिलकेचा अर्थसंकल्प सादर

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या काल २०२०-२१ या वर्षाचे अंदाजपत्रक काल संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर झाले असून त्यात एकूण-११८ कोटी ५९ लाख ०८ हजार २७३ रुपये जमा होणारा म्हसुल असून यात आगामी वित्तीय वर्षात होणार खर्च ११८ कोटी ०५ लाख ३३ हजार ४७४ रुपये असून ३१ मार्च २०२१ अखेर ५३ लाख ७४ हजार ७९९ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प कोपरगाव नगरपरिषदेने सादर केला आहे.तथापि अर्थसंकल्पापेक्षा या सभेत शहरातील अतिक्रमण व बाबूलाल वाणी फ्रुट मार्केट,व अतिक्रमण धारकासाठीचे पुनर्वसन करण्यासाठीच घडाभर तेल वाया गेल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात आ. आशुतोष काळे यांना बरोबर घेऊन विकास कामे करणार व कोपरगाव पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व जुने येणे वसूल करण्यासाठी पालिका कठोर पावले उचलणार असून थकबाकीदारांनी आपल्या बाक्या तातडीने भरणे आवश्यक आहे-अध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव नगरपरिषदेने आज सकाळी अकरा वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली आपला अर्थसंकल्प सादर केला असून त्यावेळी उपनगराध्यक्ष व सेनेचे गटनेते योगेश बागुल, राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,संदीप वर्पे,मंदार पहाडे,सेनेच्या नगरसेविका सपना मोरे,नगरसेविका ऐश्वर्या सातभाई,रेखा काले, दीपा गिरमे,सुवर्णा सोनवणे, प्रतिभा शिलेदार, वर्षा शिंगाडे, संदीप पगारे, मंगल आढाव, माधवी वाकचौरे, वर्षा कहार, अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद,शिवाजी खांडेकर,आरोग्य सभापती अनिल आव्हाड, विद्या सोनवणे, भरती वायखिंडे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे,नगरपरिषद अभियंता डी. एस.वाघ.आदी प्रमुख सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी हजर होते.

यावेळी कोपरगाव नगरपरिषदेचे लेखा अधिकारी तुषार नालकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले.त्यावेळी त्यांनी आपल्या अंदाजपत्रकात १ एप्रिल रोजीच्या प्रारंभीची शिल्लक ३९ लाख ४४ हजार ७७३ रुपयांची दाखवली असून भाग-१ मध्ये संकलित कर इतर कर मिळून १० कोटी ३६ लाख ९५ हजार रुपये दाखवले आहे.नगरपरिषद मालमत्ता व उपयोगिता सेवा या मार्फत रुपये १ कोटी ८३ लाख २३ हजार ५०० दाखवले आहेत.विविध अनुदाने मिळून रुपये २.५० कोटी व उर्वरित बाबी पासून मिळणारे उत्पन्न ३९ कोटी ५६ लाख ४५ हजार असे दाखवले आहे.असे एकूण मिळणारे उत्पन्न रुपये ४३ कोटी ८९ लाख ६८ हजार ५०० असे होत असून भाग-२ मधील भांडवली जमा ,विकास योजना व अनुदाने व कर्जे रुपये ७४ कोटी २९ लाख ९५ हजार,असे एकूण उत्पन्न रुपये ११८ कोटी ५९ लाख ०८ हजार २७३ दर्शविले आहे.

कोपरगाव पालिकेने सादर केलेले अंदाजपत्रक बरोबर असून नगरपरिषदेने आलेल्या निधीचे त्याच वित्तीय वर्षात खर्च गरजेचा आहे.शिवाय तरतूद केलेल्या निधिची त्यावर खर्च करून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.पर्यटन,अमरधाम,तीर्थक्षेत्र,समाज मंदिरे यांची काळजी घेणे आवश्यक आहे.-विरेन बोरावके गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस

तर खर्चाची बाजू भाग- १ मध्ये कर्मचारी वेतनावर रुपये ७ कोटी ७९ लाख ७४ हजार २१० दाखवले असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर वेतनावर होणारा खर्च रुपये ४ कोटी ५७ लाख ७६ हजार ७६३ असा दर्शवला असून सार्वजनिक सुरक्षितता आरोग्य शिक्षण व संकीर्ण आदी सर्व विभागाचा आवश्यक महसुली खर्च रुपये ११ कोटी ६८ लाख ५७ हजार ५०० असा एकूण सर्वसाधारण खर्च रुपये २४ कोटी ०६ लाख ०८ हजार ४७३ हजार दाखवला आहे.भाग-२ मध्ये भांडवली कामासाठी खर्च रुपये ९३ कोटी ९९ लाख २५ हजार दर्शविला सून एकूण खर्च रुपये ११८ कोटी ०५ लाख ३३ हजार ४७३ दाखवला आहे.व ३१ मार्च २०२१ या वर्षाखेर संभाव्य शिल्लक रुपये ५३ लाख ७४ हजार ७९९ रुपये दाखवली आहे.यात विद्युत देयके,पाणी पुरवठा, पथदिवे, आरोग्य,विभागाचे खर्च,जलसंपदा विभागाची पाणीपट्टी,पाणीपुरवठा कर्ज हप्ता,नगरपरिषद शिक्षण मंडळ दहा टक्के वर्गणी, न्यायिक कामासाठी खर्च सार्वजनिक कामासाठीच खर्च विविध शासकीय योजनांचा हिस्सा सेवानिवृत्त कर्मचारी याचे उपदान व राजा वेतन खर्च आदी मिळून ३१६१.२४ लाख रुपये खर्च दर्शवला आहे.

संकलित कर,नळ पाणीपट्टी मार्केट कर, गाळा भाडे,नगर परिषद मालमत्ता व उपयोगिता सेवा पासून मिळणारे कर,नागरपरिषदेस मिळणारे अनुदान,मुद्रांक शुल्क,करमणूक कर, जमीन महसूल बिनशेत सारा आदी मिळून १२७६.४७ लाख उत्पन्न दाखवले गेले आहे.

दरम्यान उपनगराध्यक्ष व शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी उचलला नसल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

या खेरीज नगरपरिषदेस विविध शासकीय कर्जाचा फास मोठा दिसत असून त्यात १७ सप्टेंबर १९७० च्या पाणी योजनेचे कर्ज रुपये २२ लाख ३७ हजार इतके असून १९८९ साली कोपरगाव शहर पाणी पुरवठा साठवण तलावासाठी रुपये १७ लाख २१ हजार. वाढीव पाणीपुरवठा योजना (१९९१) रुपये ३९.०६ लाख,वाढीव पाणी पुरवठा (१९९२ )साठी टप्पा-१ व २ साठी रुपये ५२ लाख ५७ हजार,खडकी पाणीपुरवठा योजना (सन-१९९३) टप्पा-२ साठी रुपये २८ लाख ८४ हजार,कोपरगाव शहर वाढीव पाणीपुरवठा योजना (१९९७) १ कोटी ४५ लाख ०५ हजार रुपये,असे एकूण या कर्जापोटी ६४ लाख ४४ हजार ७१२ रुपये इतकी रक्कम देय बाकी आहे.या खेरीज नगर रचना विभागाचे देणे बाकी रुपये १ कोटी ०७ लाख ०४ हजार ४९९ इतकी आहे.एकात्मिक शहर विकास योजना या मथळ्याखाली रुपये २ कोटी ९२ हजार ६०१,शासनास विविध योजना मंजूर करताना विशिष्ट हमी द्यावी लागते त्यापोटी रुपये १ कोटी ३८ लाख २६ हजार ७९० इतकी रक्कम देय आहे.फायर कर्ज हप्ता रुपये ६ लाख ४३ हजार ७८७ इतका देय दिसत आहे.या खेरीज जलसंपदाची उचल पाण्याची पट्टी ३ कोटी ९३ लाख १३ हजार इतकी प्रलंबित आहे हे विशेष.त्यामुळे नगरपरिषदेस आपल्या खर्चास यावर घालून काटकसरीची सवय अंगिकारावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close