जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

निरीक्षणवृत्तीतून संशोधक तयार होतात – डॉ. अरविंद नातू

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विज्ञान प्रदर्शनातून संशोधन वृत्ती वाढीस लागते. संशोधक हा शहरी भागातीलच असतो असे नाही फक्त डोळे उघडे ठेवून चौकस बुद्धीने विचार करणारा सामान्य माणूसही संशोधकच असतो. निरीक्षण वृत्तीतूनच संशोधक तयार होत असल्याचे प्रतिपादन आय.आय.एस.ई.आर. पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातु यांनी कोकमठाण येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शिक्षणाला अध्यात्माची जोड असेल तर शिक्षणाची गुणवत्ता वाढते. शिक्षण देत असताना विद्यार्थ्यामधील कला गुणांना वाव देता असतो त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणजे विज्ञान प्रदर्शन होय. विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना मिळावी यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. अहमदनगर जिल्हयामध्ये कोपरगांव तालुक्याचा शिक्षणाच्या दर्जात प्रथम क्रमांक लागतो-जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, शोलय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर आणि आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४५ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांचे हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मान अहमदनगर जिल्हयाला दिला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाच्या यजमानपदाचा मानही महाराष्ट्राला, नगर जिल्हयाला त्यातच आत्मा मालिकला द्यावा असी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहण्याची संधी मिळावी यासाठी प्रदर्शन दाखविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने करावे – राजेश परजणे

सदर प्रसंगी जंगलीदास महाराज, परमानंद महाराज, निजानंद महाराज,विवेकानंद महाराज, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, एन.सी.ई.आर.टी. दिल्लीचे प्राध्यापक डॉ. दिनेश कुमार, महिला व बालकल्याण विभागाचे सभापती मिराताई शेटे, जि.प. सदस्य राजेश परजणे, विमलताई आगवण, सोनाली वाबळे,कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, आसणे, डाएट प्राचार्या डॉ. अचला जडे, प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रविंद्र रमतकर, मनिषा भडंग, शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, उपशिक्षणाधिकारी रामदास हराळ, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तविक करताना रवींद्र रमतकर म्हणाले कि,राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे भरविले आहे. या प्रदर्शनामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील एकूण ३६२ प्रतिकृती व उपकरणांचा समावेश आहे. एकूण ४०० विद्यार्थी व ४०० शिक्षक व १०० अधिकारी अशा ९०० लोकांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे.

या उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन अजय देसाई यांनी केले तर आभार मनिषा भडंग यांनी मांडले. या सर्व प्रदर्शनाचे नियोजनकामी प्राचार्य निरंजन डांगे, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद परीश्रम घेत आहे. विज्ञान प्रदर्शन सर्वासाठी खुले असून जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी याचा लाभा घ्यावा असे आवाहन आत्मा मालिकच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close