जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
आधुनिक शिक्षण प्रणालीतुन कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वसामान्य शेतकर्यांचे स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम फार्मर्स डेन पब्लीक स्कुलच्या माध्यमातुन पुर्ण होतांना दिसत असल्याचे गौरोद्गार नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना काढले आहे.
राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना आपले समाजाशी काही देणे आहे. या उदात्त हेतुने ग्रामिण भागातील मुलांना इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण मिळावे. शहरीभागापेक्षा ग्रामिण भागातील मुले ही गुणी असतात. या गुणी मुलांना उच्च शिक्षण घेवुन शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी पंडीतराव चांदगुडे यांनी खेडयापर्यंत इंग्रजी शिक्षणव्यवस्था निर्माण केली हे कौतुकास्पद आहे. – आ. माणिक कोकाटे
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी विकास प्रतिष्ठाण संचलित फार्मर्स डेन पब्लीक स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधिर तांबे होते.
सदर प्रसंगी सिन्नर मतदारसंघाचे आ. माणिकराव कोकाटे, आमदार आशुतोष काळे, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, महानंदा दुध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, नाशिक महानगरपालीकेच्या नगरसेविका वर्षा अनिल भालेराव, संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जि. प. सदस्य सुधाकर दंडवते, सरपंच निळकंठ चांदगुडे, उपसरपंच मनोज गाडे, मंदाकिनी चांदगुडे, स्वाती चांदगुडे, गोदावरी विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पंडीतराव चांदगुडे, प्राचार्य निखिल मनतोंडे ,नारायण मांजरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच चासनळी ग्रामपंचायतच्या वतीने अब्राहम लिंकन यांचे विचार असलेल्या फोटोचे सप्रेम भेट देण्यात आले.
केंद्र सरकार कायदे करण्यात मग्न आहे. परंतु मराठी सोबत इंग्रजीचे शिक्षण शेतकर्यांच्या मुलांपर्यत पोहचावेे व गा्मीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षण घेवुन गावाचे नाव राज्यात उज्वल करतील अशी व्यवस्था होणे अपेक्षित असतांना गा्मिण भागातील कार्यकर्त्यांने पुढाकार घेवुन जनहीतासाठी दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणुन फार्मर्स डेन पब्लीक स्कुलच्या माध्यमातुन प्रयत्न होत आहे लवकरच या संस्थेच्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही-आ. काळे
पुढे बोलताना ते म्हणाले की, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्याचे काम महात्मा जोतीबा फुले यांनी केले. शिक्षण व्यवस्थेत अर्थकारण व राजकारण आल्याने सामाजिक संस्कृती बिघडत असली तरी चासनळी गावामध्ये पंडीत चांदगुडे यांसारख्या भुमीपुत्रानी मराठी व इंग्रजी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा विडा उचलला आहे. कमी कालावधीमध्ये फार्मर्स डेन स्कुलने यशाची गगन भरारी घेवून आर्दश निर्माण केला आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंडीतराव चांदगुडे यांनी केले. सुत्रसंचलन माधुरी चांदगुडे, मिरा गडाख व मुकुंद शिरसाठ यांनी तर आभार रविराज चांदगुडे यांनी केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त रविराज चांदगुडे, युवराज चांदगुडे, संस्थेचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.