जाहिरात-9423439946
तंत्रज्ञान

विद्यार्थ्यांच्या विचारांना गती देण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त – संदीप रोहमारे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

समता इंटरनॅशनल स्कूलने विविध विषयांचे प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या विचारांना गती प्राप्त करून व्यावहारिक व सकारात्मक दृष्टीकोनातून उज्वल भविष्य घडविण्याचे दालन खुले करून दिले असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे यांनी कोकमठाण येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.

या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की,‘सीबीएसई पुरस्कृत विविध विषयांच्या प्रदर्शनामध्ये उपकरणे तयार करणे, सुप्तगुण आणि कलेद्वारे विविध नाटिकांच्या माध्यमातून प्रदर्शन घेण्याचा निर्णय होऊन तो प्रत्यक्षात आला. यातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सुप्त गुणांना वाव मिळाला आहे’.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी,गणित,जर्मन, विज्ञान, समाजशास्त्र, संगीत, हस्तकला, संगणक आदि विषयांच्या उपकरणांचा, विविध कलांचा प्रदर्शन सोहळा नुकताच उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्या स्मिता रोहमारे, समता स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे व संदीप कोयटे,सिमरन खुबानी, तुषार बागरेचा, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन, उपप्राचार्य विलास भागडे, उपप्राचार्या शैला झुंजारराव तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले कि, ‘शालेय स्तरावर अशा प्रदर्शनांना मर्यादित न ठेवता उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्कूलचे उपप्राचार्य विलास भागडे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांनी केले. त्या म्हणाल्या की, ‘समता स्कूलमध्ये विविध विषयांचे प्रदर्शन घेऊन त्यांच्या विचारांना चालना देऊन विद्यार्थ्यांमध्ये धीटपणा, सकारात्मक दृष्टीकोन वाढवा यासाठी ‘थिंकोपिडिया’कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. या प्रदर्शनामध्ये समता स्कूलमधील माध्यमिक विभागातील इयत्ता ६ वी ते ९ वी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेली कला पाहून त्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्निशा कोठारी, राजवी गवारे, आर्यन औताडे, सोहम साताळकर यांनी केले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार उपप्राचार्या शैला झुंजारराव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close