जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. त्याला विद्यार्थी ,पालक यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे तर प्रमुख अतिथी पदी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुणाचे प्रदर्शन करत देशभक्तीपर गीत,लोकगीत,विविध प्रांतिक नृत्य,लावणी,कोळीनृत्य,समाजप्रबोधनपर नाटिका आदींचे सादरीकरण केले.या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पालकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे.
या कार्यक्रमास सरपंच जयश्री भाकरे, काळे कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर कुलकर्णी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी,भगवान माळी,श्रीकृष्ण गाडे,पुंडलिक माळी,कैलास माळी,अशोक म्हस्के,माणिक सोमासे,अरुण भाकरे,सुदाम गाडे,भास्कर वाघ,दत्तात्रय वाघ,सुभाष उसळे,,बाळासाहेब माळी,पोपट माळी,गोरक्षनाथ सोनवणे,वऱ्हाडे नळे,घुले दत्तात्रय,काकासाहेब खर्डे,निवृत्ती शिंदे आदी मान्यवर तसेच शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती ,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत मोरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत गायकवाड एस.एस.यांनी तर सूत्रसंचलन एस.एस.चव्हाण व एस.एस.ठाकूर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.एन.निकम,एस.एस.चव्हाण,ए.टी.गायकवाड,आर.एस.गवळी,बी.एम.गायकवाड,एस.एन .जेजुरकर, एस.एस.गायकवाड,ए.एन वाघ,ए.पी.माळी,एस.एस.ठाकूर,एन.एन.कडाळे,एस.यु.नागरे,डी.एन.बरफे.चेतन माळी,भवर मामा,राजगुरू मामा यांनी परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार ए.टी..गायकवाड यांनी मानले.