शैक्षणिक
आपेगावच्या या विद्यार्थ्यांची ‘नीट’मध्ये बाजी !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नीट) निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून या परीक्षेमध्ये तालुक्यातील आपेगावचा विद्यार्थी मयुर अरुण पगारे याने लक्षवेधी यश संपादन केले आहे.’नीट’मध्ये ७२० पैकी ५२७ गुण मिळवत एम.बी.बी.एस.अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. आपेगावमधून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड होणारा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘नीट’ परीक्षेचे आयोजन केले जाते.काठिण्यपातळी अधिक मानल्या जाणाऱ्या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ट होतात.मात्र कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातील मयूर पगारे याने जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘नीट’ परीक्षेचे आयोजन केले जाते.काठिण्यपातळी अधिक मानल्या जाणाऱ्या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ट होतात.मात्र कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातील मयूर पगारे याने जिद्द आणि सातत्याच्या बळावर मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मयूर पगारे याचे प्राथमिक शिक्षण आपेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.माध्यमिक शिक्षणासाठी एस.जी.विद्यालयात प्रवेश घेतला होता.उच्च माध्यमिक शिक्षण संजीवनी ज्युनिअर कॉलेजमधून पूर्ण केले आहे.लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयात एम.बी.बी.एस.ची परीक्षेची तयारी केली होती.मयूरचे वडील नगरपालिका शिक्षण मंडळात प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी आहे.
मयूर पगारे याच्या या यशाबद्दल नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मोहनीश तुंबारे,आपेगावचे सरपंच शिवनाथ खिलारी,ह.भ.प हौशिराम बर्गे,नगरपालिकेच्या सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृदांनी अभिनंदन केले आहे.