जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
खेळजगत

खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते-कोयटे यांचे प्रतिपादन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते त्यामुळे समता विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून विविध क्रीडा प्रकारच्या माध्यमातून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्याचे प्रयत्न समता सदैव करत असून समताच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करून समताचे नाव महाराष्ट्रात नावारूपाला आणले असल्याचे प्रतिपादन समताचे संस्थापक ओमप्रकाश कोयटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“समताच्या विद्यार्थ्यांनी समता पॅटर्न नुसार इ.१० वी आणि इ.१२ वी च्या परीक्षेमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात यश संपादन केले असून क्रीडा क्षेत्रातही समता स्कूलचे विद्यार्थी यश संपादन करीत आहे याचा संस्थेला अभिमान असून संस्था त्यांच्या पाठीशी आहे.या सर्व यशामध्ये समता स्कूलचे व्यवस्थापन मंडळ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींचा वाटा आहे”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष समता नागरी सहकारी पतसंस्था.

राष्ट्रीय हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन क्रीडा क्षेत्रात उत्साहात साजरा केला जातो.या दिवसाला क्रीडा क्षेत्रात विशेष महत्व देण्यात आलेले आहे.राष्ट्रीय क्रीडा दिन समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत २०२०-२०२१ या वर्षी समताच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या प्राविण्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
प्रसंगी ‘समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,संचालक स्वाती कोयटे,मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका लिसा बर्धन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि, ‘समताच्या विद्यार्थ्यांनी समता पॅटर्न नुसार इ.१० वी आणि इ.१२ वी च्या परीक्षेमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात यश संपादन केले असून क्रीडा क्षेत्रातही समता स्कूलचे विद्यार्थी यश संपादन करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.समता त्यांच्या सदैव पाठीशी आहे.या सर्व यशामध्ये समता स्कूलचे व्यवस्थापन मंडळ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींचा वाटा आहे. त्यामुळे समता स्कूलचा प्रत्येक सेवक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहोत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले कार्यक्रमाला काही विद्यार्थी व पालक यांनी फेसबुक द्वारा ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले. समता स्कूलच्या एल.के.जी. आणि यु.के.जी.तील विद्यार्थी समता स्कूलमध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहिले.विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचा ऑनलाइन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आभार क्रीडा शिक्षक रोहित महाले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close