खेळजगत
महर्षी विद्यालयाचा क्षितीज कानडे याला रौप्य पदक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
नुकत्याच बारामती येथे पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय कराटे स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील संत जनार्दन स्वामी (मौ) महाराज महर्षी विद्या मंदिर विद्यालयातील इ १० वी तील विद्यार्थी क्षितीज दत्ताञय कानडे याने लक्षवेधी खेळ दाखवत 75 कि.ग्रॅ. वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल त्याला विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे व पर्यवेक्षिका दरेकर मॕडम सर्व विश्वस्त व शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. क्षितीज कानडे याच्या या यशाबद्दल त्याला विद्यालयाचे कराटे क्रीडा प्रशिक्षक योगेश बिडवे यांचे मार्गदर्शन लाभले होते.