कोपरगाव तालुका
धामोरीतून विवाहिता गायब,कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
मूळ गुजरात राज्यातील बलसाड जिल्ह्यातील रिटमाळी येथील कायम निवासी असलेली मात्र सध्या कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे शेतमजूर म्हणून कार्यरत असलेली विवाहित महिला कविता जितेंद्र पवार (वय-19) हि पिण्याचे पाणी घेऊन येते असे शनिवार दि.9 नोव्हेंबर रोजी सांगून जे गेली ती परतलीच नसल्याची तक्रार तिचा पती जितेंद्र भिवा पवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी हरवल्याची नोंद आपल्या दप्तरी घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री तोर्वेकर हे करीत आहेत.