जाहिरात-9423439946
सहकार

सहकारी दूध संघांना साॅर्टेड सिमेनसाठी अनुदान उपलब्ध द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी तत्वावरील दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळालेली असून भविष्यात या व्यवसायाला अधिक गती मिळण्यासाठी व जातीवंत गाईंची संख्या वाढविण्यासाठी शासनाने राज्यातील सहकारी दूध संघांना सॉर्टेड सिमेनसाठी अनुदान उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी  राजेश परजणे यांनी नूकतीच एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

“दूध सहकारी संघाने १.५ मेगावॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प उभारणीचे कामकाज हाती घेतलेले असून सदरचे कामकाज शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे.सदरचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वीत होईल.राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (आनंद) यांच्या संयुक्त सहकार्याने संघ परिसरातील दूध उत्पादकांना बायोगॅस (गोबरगॅस) संयंत्र अनुदान तत्वावर उपलब्ध करून देत आहोत”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे तालुका सहकारी दूध संघ,सहजानंदनगर.

कोपरगाव तालुक्यातील सहकारी दूध चळवळीतील अग्रणी असलेल्या गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यावेळी  संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे बोलत होते.

सदर प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार,संचालक विवेक परजणे,उत्तम डांगे,भाऊसाहेब कदम,गोरक्षनाथ शिंदे,नानासाहेब काळवाघे,सुदाम कोळसे,जगदीप रोहमारे,संजय टुपके,भिकाजी झिंजुर्डे,दिलीप तिरमखे,सुनंदा होन,सरला चांदर, सुमन शिंदे तसेच नानासाहेब सिनगर,भागवत धनवटे,संजीवनी कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते,सुभाष होन,उत्तम माने,निवृत्ती नवले,यशवंत गव्हाणे,सदाशिव कार्ले,सिताराम कांडेकर,कैलास पायमोडे,बद्रीनाथ बल्टे,दत्तात्रय शितोळे,प्रभाकर मलिक,सोपान चांदर,बाळासाहेब रहाणे,बाबासाहेब कोताडे यांच्यासह संघाचे सभासद,दूध संस्थाचे प्रतिनिधी,दूध उत्पादक शेतकरी,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”उरळीकांचन येथील भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या सहकार्याने गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये ४१ केंद्रांमार्फत कृत्रिमरेतन गर्भधारणा उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जातीवंत गाईंची पैदास केली.याशिवाय संघाने भारतात सर्वप्रथम गोदावरीच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेड सिमेनसारखा उपक्रम राबवून ३० ते ३५ लिटर दूध देणाऱ्या गाईंची पैदास करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण करुन दिली. हा कार्यक्रम राबविताना सॉर्टेडसिमेनचा दर प्रत्यक्षात १ हजार ५० रुपये असताना दूध उत्पादकांकडून केवळ चारशे रुपये एवढे नाममात्र शुल्क संघ आकारतो.यासाठी संघ दरमहा सव्वा दहा लाखाहून अधिक रुपये खर्च करीत आहे. दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी कार्यक्षेत्रात प्रशिक्षणाच्या माध्यमातून जातीवंत गाई,म्हशी व शेळ्यांची पैदास, कृत्रिमरेतन,पशुआरोग्य,लसीकरण,वैरणविकास,खनीजमिश्रण,बालसुग्रास,स्वयंसहाय्यता महिला बचतगट अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व मागील सभेचे वाचन संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी केले तर सूत्रसंचालन यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष गोपीनाथ केदार यांनी मानले आहे.

   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close