जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दिनांक १२ जुलै पासून सुरु असलेल्‍या श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता आज ह.भ.प.स्‍नेहल पित्रे,डोंबवली यांच्‍या काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली आहे.

सायंकाळी ०६ वाजता विश्‍वस्‍त सुरेश बावळे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सिंधुताई वाबळे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. सायं.०७ वाजता धुपारती झाली.रात्रौ ०७.३० ते ०९.१५ यावेळेत श्री वैष्‍णवीस नृत्‍य संस्‍था,तेलंगणा यांचा नृत्‍य नाटक कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर झाला आहे. यासर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिली.रात्रौ १० वाजता श्रींची शेजारती झाली आहे.

आज उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सकाळी ०७.०० वाजता संस्‍थानच्‍या विश्‍वस्‍त श्रीमती मिनाताई शेखर कांबळी यांनी सहपरिवार समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली.तर विश्‍वस्‍त अॅड.सुहास आहेर व त्‍यांची सुविद्य पत्‍नी स्मिता आहेर यांनी गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा केली. यावेळी विश्‍वस्‍त सचिन गुजर उपस्थित होते.सकाळी १०.०० वाजता काल्याच्‍या किर्तनानंतर दहिहंडी फोडण्‍यात आली आहे.

सदर प्रसंगी संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत,विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर,अविनाश दंडवते,सचिन गुजर,सुरेश वाबळे,जयंतराव जाधव,महेंद्र शेळके,डॉ.एकनाथ गोंदकर,सुनिल शेळके,सचिन कोते,प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले,संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी,मंदिर प्रमुख रमेश चौधरी,मंदिर पुजारी,शिर्डी ग्रामस्थ व साईभक्‍त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली.सायंकाळी ०६ वाजता विश्‍वस्‍त सुरेश बावळे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सिंधुताई वाबळे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. सायं.०७ वाजता धुपारती झाली.रात्रौ ०७.३० ते ०९.१५ यावेळेत श्री वैष्‍णवीस नृत्‍य संस्‍था,तेलंगणा यांचा नृत्‍य नाटक कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर झाला आहे. यासर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी उत्‍स्‍फुर्त दाद दिली.रात्रौ १० वाजता श्रींची शेजारती झाली आहे.

श्री गुरुपौर्णीमा उत्सवात मंदिर व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करणारे साई समर्थ डेकोरेटर्स,शिर्डीचे सदस्‍यांचा संस्थानच्या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला.यावेळी विद्युत विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोषकाळे,उपाध्यक्ष अॅड.जगदीश सावंत,मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व सर्व विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव,सर्व प्रशासकीय अधिकारी,संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी,सर्व विभागप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close