जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

साई भक्तांसाठी शिर्डीत हेल्पलाईन उपलब्ध

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर साईभक्‍तांना शिर्डीची वारी व श्रीं चे दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्‍पलाईन कक्ष, कंट्रोल रुम व व्हाट्सअप ही सुविधा कायमस्‍वरुपी २४ तास सुरु करण्‍यात आलेली आहे.

दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे.

सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन लॉकडाऊन करण्‍यात आलेले होते. दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन मंदिर खुले झाल्‍यामुळे हजारो साईभक्‍त श्रीं च्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत आहे. या साईभक्‍तांना शिर्डी येथे येण्‍यापुर्वी व आल्‍यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा व दर्शनाची परिपुर्ण माहिती सहज व सुलभरित्‍या मिळावी. तसेच त्‍यांची फसवणुक होऊ नये या उद्देशाने संस्‍थानच्‍या वतीने हेल्‍पलाईन कक्ष, कंट्रोल रुमची निर्मीती करण्‍यात आलेली आहे. हे कक्ष साईभक्‍तांकरीता कायमस्‍वरुपी २४ तास उपलब्‍ध असणार आहे.
याकरीता श्री साईबाबा संस्‍थानचे हेल्‍पलाईन मोबाईल नंबर +९१७५८८३७४४६९,+९१७५८८३७३१८९ , +९१७५८८३७५२०४, कंट्रोल रुम मोबाईल नंबर +९१७५८८३७१२४५ , +९१७५८८३७२२५४ व व्हाट्सएप नंबर +९१९४०३८२५३१४ हे क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहेत. तरी साईभक्‍तांनी अधिक माहिती करीता या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close