जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार म्हस्के…या पक्षात प्रवेश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबई-(प्रतिनिधी)

जेष्ठ राजकीय विश्लेषक ताराचंद म्हस्के पाटील हे गुरुवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्रवादी भवनात प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी राष्ट्रवादी च्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्याताई चव्हाण,प्रदेश युवक चे अध्यक्ष मेहबूब शेख पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे हे मान्यवर उपस्थित होते.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व जाती,पंथ,धर्म यांना सोबत घेऊन समाज कार्य करत असल्याने त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडला आहे तसेच पक्षाचे जेष्ठ नेते उपमुख्यमंत्री पवार व गृहमंत्री वळसे पाटील हे मातब्बर नेते सुद्धा सर्वच जाती धर्मियांना सोबत घेऊन कांम करणारे आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वच घटकांचे हित जोपासणारा पक्ष असल्याने अशा पक्षात काम करण्याची मोठी संधी मला मिळाली आहे.पक्ष बळकटी साठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे”-ताराचंद म्हस्के,जेष्ठ पत्रकार.

ताराचंद म्हस्के पाटील हे गेली ३७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.परखड,अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.पत्रकारितेत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून ते नगर जिल्ह्यातील पहीले पत्रकार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत.गुरुवारी ताराचंद म्हस्के पाटील यांना मुंबईत बेलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या मुख्यालयात सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री अजित दादांनी पक्षात दाखल करून घेतले आहे.

सदर प्रसंगी अजित दादा म्हणाले,”अतिशय परखड मते मांडण्याचे काम अनेक वर्षे ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील यांनी केलेले आहे.मागे आपण व दिलीप वळसे पाटील शिर्डीच्या दौऱ्यावर गेलो असतांना आम्ही सर्वांनी त्यांना ताराचंद म्हस्के विनंती केली होती की,”तुम्हाला शरद पवार यांचे विचार माहीत आहेत.आम्ही सर्व जाती पंथांना बरोबर घेऊन जाणारे लोक असल्याने तुमच्या सारख्यांचे सहकार्य मिळाले तर आणखी त्यात चांगली भर पडणार आहे.आपण व दिलीप वळसे पाटील यांनी म्हस्के यांना पक्षात येण्याची विनंती केली व त्यांनीही आज पक्षात प्रवेश घेऊन आमचा मान ठेवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत आहे असे अजित पवार म्हणाले. म्हस्के पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट होण्यासाठी नक्कीच सहकार्य मिळेल.पक्षाचे विचार व ध्येय धोरणे शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचे काम होईल,तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी हा पक्ष प्रवेश प्रभावी ठरेल असा विश्वास व्यक्त करून अजित पवार यांनी ताराचंद म्हस्के पाटील यांचे पक्ष प्रवेशाचे स्वागत केले आहे.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला महिला प्रदेश अध्यक्ष विद्या चव्हाण,प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख,युवक चे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, उपाध्यक्ष अमोल मातेले हे मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close