जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

खा.लोखंडेंच्या हस्ते सेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिवसेनेचे नूतन शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते व जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

कोपरगाव शहर अपनी परिसरात मोठ्या प्रमाणावर गायींची तस्करी होत असून आरोपी गायींना मूर्च्छित पाडून त्यांची वाहनातून चोरी करीत असल्याने गोपालक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी-कलविंदर दडियाल-अध्यक्ष शहर शिवसेना

शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या सूचनेप्रमाणे नुकतीच कोपरगाव शहर शिवसेनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.शहरप्रमुख दडियाल यांनी कोपरगावात होत असलेल्या गो-तस्करीची माहिती खा. सदाशिव लोखंडें यांना दिली आहे.व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे.

यावेळी शिर्डी विधानसभा संघटक कमलाकर कोते,शिर्डी तालुकाप्रमुख संजय शिंदे,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, विक्रांत झावरे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,गोपाल वैरागळ,भूषण पाटणकर,शहर संघटक नितीन राऊत,बाळासाहेब साळुंके,सहसंघटक वैभव गिते,विशाल झावरे,वाहतूक सेना तालुका प्रमुख इरफान शेख,समीर शेख,अमोल गायके,पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी,भास्कर मोतकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close