जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

हाथरस घटनेचा चर्मकार महासंघाच्या वतीने निषेध

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील अल्पवयीन मुलीवर काही असामाजिक तत्त्वांनी अमानुष बलात्कार केला त्या घटनेचा निषेध राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देवुन निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आपल्या आई समवेत गवत कापण्यास गेलेल्या दलित मुलीवर काही असामाजिक तत्त्वांनी सामूहिक अत्याचार केला आहे.त्याचे पडसाद देशभर उमटले आहे.कोपरगावातही याचे पडसाद उमटलेले असून या घटनेचा निषेध करुन घटनेबाबत माहिती देतांना नराधमांनी बलात्कार करून सदर पीडितेचे हातापायाची हाडे तोडली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे आपल्या आई समवेत गवत कापण्यास गेलेल्या दलित मुलीवर काही असामाजिक तत्त्वांनी सामूहिक अत्याचार केला आहे.त्याचे पडसाद देशभर उमटले आहे.कोपरगावातही याचे पडसाद उमटलेले असून या घटनेचा निषेध करुन घटनेबाबत माहिती देतांना नराधमांनी बलात्कार करून सदर पीडितेचे हातापायाची हाडे तोडली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.आज ती हयात नसली तरी तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबाबात अमानुष घटनेचे कथन केलेले आहे.त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक केली.दलित परिवारातील कुमारी मुलीवर नराधम गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे दुष्कृत्य केले आहे.अशा नराधमांवर जलद गती न्यायालयात दावा दाखल करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या संघटनेचे संस्थापक बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ या संघटनेने केली आहे.

या वेळी सुरक्षित अंतर पाळत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नाशिक विभागीय (उत्तर महाराष्ट्र) अध्यक्ष दिलीप कानडे,माजी पंचायत समिती सदस्य तथा अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अशोक कानडे,शहर अध्यक्ष गणेश कानडे,राज्य कार्यकारणी सदस्य एम.डी.कानडे,युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग,जिल्हा सचिव संजय पोटे,अँड,रमेश दुशिंग,तालुका अध्यक्ष संतोष शिंदे,सागर पोटे,संतोष कानडे,देवीदास कानडे,संकेत कानडे आदी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close