जाहिरात-9423439946
कृषी विभाग

मंत्री बच्चू कडू यांची राहाता तालुक्यातील संकेत नर्सरीला सदिच्छा भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

अचलपुरचे आमदार व राज्याचे जलसंपदा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी नुकतीच राहाता तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी नेते रुपेंद्र काले यांची विविध राज्यात प्रसिद्ध असलेल्या नर्सरी संकेत नर्सरीत भेट दिली असून तेथे त्यांनी औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अजित काळे यांच्याशी विविध सामाजिक प्रश्नावर चर्चा केली आहे.त्याची हि बैठक अत्यन्त गुप्त ठेवण्यात आलेली होती त्याची खबर केवळ त्यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनाच माहिती असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी संकेत नर्सरीतील विविध फळे,फुलांच्या रोपांची माहिती घेतली व त्यातील निवडक रोपे आपल्यासाठी नोंदवली आहे.त्याची शेती बेलोरा ता.चांदूरबाजार येथे आहे.त्याबाबत विकास करण्यासाठी त्यांनी हि भेट दिली असल्याची माहिती या नर्सरीचे संचालक रुपेंद्र काले यांनी दिली आहे.

ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून जि.अमरावती सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत.युवकांचे संघटन करुन शेतकरी,दिव्यांग आणि स्थानिकांचे अनेक प्रश्न त्यांनी आक्रमकपणे समोर आणले आहेत.आपल्या अभिनव आंदोलनाबद्दल बच्चू कडू महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू यांनी शिवसेनेच्या कोट्यातून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार या खात्यांच्या राज्यमंत्री पदाची शपथ ३० डिसेंबर २०१९ रोजी घेतली आहे.महाराष्ट्रामध्ये ते “बच्चूभाऊ” या नावाने लोकप्रिय असून “अपना भिडू बच्चू कडू” ही त्यांच्या समर्थकांची आवडती घोषणा आहे.त्यांचा सामाजिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अधिकांऱ्या विरोधातील लढा राज्यात प्रसिद्ध आहे.त्यांचे अलीकडील काळात कृषी क्षेत्रात स्वारस्य वाढत चालले असून त्यांना फळ शेतीचे ज्ञान मिळवून ते विकास करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्या नुसार हा दौरा संपन्न झाला असल्याचे समजते.

सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचा अर्धशतकभर प्रलंबित असलेला कालव्यांचा उच्च न्यायालयातील न्यायिक लढा यशस्वीपणे लढवणारे प्रसिद्ध वकील अजित काळे,प्रहारचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार,जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,कृष्णा सातपुते,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष जयेन्द्र काले,याचीकाकर्ते विक्रांत काले,संकेत काले,अमोल गंगवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी संकेत नर्सरीतील विविध फळे,फुलांच्या रोपांची माहिती घेतली व त्यातील निवडक रोपे आपल्यासाठी नोंदवली आहे.त्याची शेती बेलोरा ता.चांदूरबाजार येथे आहे.त्याबाबत विकास करण्यासाठी त्यांनी हि भेट दिली असल्याचे समजते.त्या वेळी अड्,अजित काळे,पत्रकार नानासाहेब जवरे,रुपेंद्र काले,पतसंस्थेचे अध्यक्ष जयेंद्र काले आदींनी शेतीसह विविध सामाजिक प्रश्नावर यांचेशी चर्चा केली असल्याचे समजते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close