जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आता तरी भानावर यावे-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील विकास कामांना थेट जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवला असताना,”ती कामे बंद करा” अशी मागणी करणे म्हणजे अकलेचे दिवाळे निघाल्यासारखे आहे.आता आम्ही या कामांना सुरवात केली असून त्यासाठी त्यांना निमंत्रित केले असतानाही काही नगरसेवकांनी,”आ.काळे यांना बोलावूं नका” अशी मल्लिनाथी करून आपली लायकी दाखवून दिली आहे आगामी काळात सुधारणा करा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.

“नगरपरिषदेत वादविवाद होऊन हि कामे मंजूर झाली असल्याने आता त्यात सर्वांनी त्यात सहभागी असायला हवे.वर्तमानात कोरोना साथ सुरु असल्याने राजकारण करू नका जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही तुम्ही पुन्हा तक्रार करता हि मस्ती नेमकी कशाची आहे असा सवाल करून आता तरी सुधारणा करून घ्या वेळ गेलेली नाही अन्यथा जनता तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथांन महाभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक तीन मध्ये सप्तर्षी मळा भागात महेश वेल्डिंग ते सुख सागर बिल्डिंग पर्यंत रस्त्याचे काम कॉंक्रिटीकरण करणे,प्रभाग क्रमांक दोन मध्ये विद्यानगर श्रीरामनगर व बँक कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे,व प्रभाग क्रमांक आठ यामध्ये संजस्वा हॉटेल ते जगताप घर ते नाल्यापर्यंत व परिसरात डांबरीकरण करणे आदी ३१ लाख ८४ हजार ५१६ रुपयांच्या कामांचा शुभारंभ कोपरगाचे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केला त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे नगरपरिषद गटनेते विरेन बोरावके,शहराध्यक्ष सुनील गंगूले,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,माजीं नगरसेवक रमेश गवळी,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,माजी आ.स्नेहलता कोल्हे या पदावर असताना व आपण नगराध्यक्ष असताना याच मंडळींनी परस्पर रस्त्यांचे उदघाटने करून घेतली होती याचा त्यांना फार लवकर विसर पडला आहे.त्या वेळी त्या आमदार असल्याचा हि मंडळी कांगावा करत असत मग आज आ.आशुतोष काळे हे आमदार आहे तर यांनी आता त्याचे का वावडे झाले आहे ? असा तिखट सवाल त्यांनी विचारला आहे.व पाच वर्ष तुमचा आमदार असताना व आपण नगराध्यक्ष असताना त्यांना श्रेय मिळू नये म्हणून म्हणून परस्पर उदघाटने उरकून घेतली होती.व आज आ.काळे यांना का बोलावले ? असा सवाल कोणत्या अधिकाराने करता आहात.नगरपरिषदेत वादविवाद होऊन हि कामे मंजूर झाली असल्याने आता त्यात सर्वांनी त्यात सहभागी असायला हवे.वर्तमानात कोरोना साथ सुरु असल्याने राजकारण करू नका जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही तुम्ही पुन्हा तक्रार करता हि मस्ती नेमकी कशाची आहे असा सवाल करून आता तरी सुधारणा करून घ्या वेळ गेलेली नाही अन्यथा जनता तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही.तुम्ही राजकरण करणार असाल तर मलाही ते नाईलाजाने करावे लागेल असा इशाराही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close