संपादकीय
मतांच्या बेगमीसाठी अस्मितांचा बाजार आम्ही थांबवणार केंव्हा ?
नानासाहेब जवरे
अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची उंची कमी करून राज्यातील युती सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्याने ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप व शिवसेनेची पंचाईत झाली असल्यास नवल नाही.वास्तविक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचाराबाबत बोलावे अशी परिस्थिती नक्कीच चांगली दिसत नाही.ज्यांनी आपल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात भ्रष्टाचाराचे नवनवे उच्चांक केले त्यांना हा अधिकार पोहचतो का हा खरा प्रश्न निर्माण होतो.म्हणून काही भाजप व शिवसेनेला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक मिळाली असाही त्याचा अर्थ होत नाही.
सावंत यांच्या म्हणण्यानुसार या शिव स्मारकाची भाजप सरकारने सन -2017 साली निविदा काढली होती.सदरचे काम एल.अँड टि. कंपनीला तीन हजार 826 कोटी रुपयांना देण्यात आले होते.त्यात पुतळ्यासह स्मारकाची उंची 121.2 मीटर होती.त्यात 83.2 मीटर उंचीचा पुतळा आणि 38 मी.तलवारीचा समावेश होता.वाटाघाटीतून सरकारने कंत्राटाची रक्कम अडीच हजार रुपयांपर्यंत कमी केली.त्यासाठी पुतळ्याच्या संरचनेतही बदल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.स्मारकाचे क्षेत्र 25.6 हेक्टर वरून 12.8 हे.कमी केले आहे.पहिल्या टप्प्यात केवळ 6.8 हेक्टरच क्षेत्र वापरले जाणार आहे.त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प व्यवहार्य आहे का.असा प्रश्न निर्माण झाला हे.या प्रकल्पाचा करारनामा 28 जून 2018 रोजी करण्यात आला होता.त्यात या प्रकल्पाचे वरिष्ठ लेखापाल यांनी त्याच दिवशी लेखी स्वरूपात असहमती दर्शवली त्यात अनेक शंका उपस्थित केल्याने खरा घोळ निर्माण झाला असल्याचा तक्रारदारांचा आक्षेप आहे.
प्रश्न या मागण्या आणि मतासाठीच्या तुष्टीकरणांचा नाही तर आम्ही या महान नेत्यांच्या विचारापर्यंत कधी पोहचणार आहोत हा आहे.महाराष्ट्रात किमान आपल्या अस्मितांची तरी दाखल घेतली जाते पण उत्तर प्रदेशात तर मायावतींनी स्वतःचे पुतळे उभारून आणखी कहर उडवून दिला होता त्या मानाने महाराष्ट्र बरा म्हणावा अशी परिस्थिती आहे.असो देशात पुतळ्याची नव्हे तर महान नेत्यांच्या विचारांची गरज आहे.
मुळात प्रश्न असा निर्माण होतो कि,राज्यात भाजप सेनेचे राज्य आल्याने त्यांनी हा प्रश्न राज्याच्या अस्मितेशी आपोआप जोडला गेला आहे.व दुसरी बाजू निवडणूका आल्या कि, लोकप्रिय घोषणा करून आपल्या मतांची बेगमी करायची हि सत्ताधारी व विरोधक यांची जुनी खोड आहे.मुदलात प्रश्न असा आहे कि,पुतळे हवेच कशाला? ज्या पुतळ्याची आपण साधी देखभाल करू शकत नाही कि साफसफाई.त्यासाठी एवढा अट्टहास कशासाठी.राज्यातील पुतळ्याची भरमसाठ संख्या पहिली कि,खरेच या महान नेत्यांकडून अथवा इतिहास पुरुषांकडून आपण प्रेरणा घेतो का ? घेत असू तर त्यांच्या विचारावर चालतो का ? हा प्रश्न त्यातून आपसूकच निर्माण होतो.राज्यात व देशात गत दहा वर्षात आम्ही डोक्यावरील कर्ज फेडू शकत नाही म्हणून साडेतीन लाख अन्नदात्यांना गमावले आहे.हि परिस्थिती आघाडीच्या काळात होती व आमच्या काळात नाही असे म्हणण्याचे धाडस भाजप-सेनेचे सरकार करू शकत नाही.आजही आम्ही प्रतिदिन शेतकऱ्यांच्या आत्महत्यांतून पंधरा शेतकऱ्यांना गमावत आहोत.आजही त्यांना आम्ही सरकार बदलूनही स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव देऊ शकलो नाही.
शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात दुष्काळ पडलेला असताना त्याच वेळी पुरातन काम करताना प्राचीन खोदाईत सोन्याच्या देवांच्या मूर्ती जिजाबाई व शिवरायांना सापडल्या होत्या त्याचे करायचे काय असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेंव्हा घडीचा उशीर न करता जिजाबाईंनी जे देव शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवू शकत नाही ते देव काही कामाचे नाही.म्हणून ते सोनाराकडे नेऊन मोडण्याचे आदेश दिले होते व त्यापासून मिळणाऱ्या धनराशीतून शेतकऱ्यांना बी-बियाणे.हलधर,बैल नसणाऱ्या शेतकऱ्यांना बैल देण्याचे आदेश देऊन आज पुरोगामी म्हणविणाऱ्यांना लाजविण्याचे महान कार्य केले होते.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ म्हणणारे आता त्यापासून पळ काढू पाहत आहे.साडेचार लाख अपघातातून दिड लाख नागरिकांना गमावत आहे.यावर या देशांत विचार होणार आहे कि नाही.ज्या मंत्र्यांनी तसा प्रयत्न करून पहिला त्यांना आम्ही साथ द्यायला तयार नाही. शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात दुष्काळ पडलेला असताना त्याच वेळी पुरातन काम करताना प्राचीन खोदाईत सोन्याच्या देवांच्या मूर्ती जिजाबाई व शिवरायांना सापडल्या होत्या त्याचे करायचे काय असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेंव्हा घडीचा उशीर न करता जिजाबाईंनी जे देव शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवू शकत नाही ते देव काही कामाचे नाही.म्हणून ते सोनाराकडे नेऊन मोडण्याचे आदेश दिले होते व त्यापासून मिळणाऱ्या धनराशीतून शेतकऱ्यांना बी-बियाणे.हलधर,बैल नसणाऱ्या शेतकऱ्यांना बैल देण्याचे आदेश देऊन आज पुरोगामी म्हणविणाऱ्यांना लाजविण्याचे महान कार्य केले होते.आज आम्ही त्यांच्या नावावर स्वतःच्या पक्षांचे हीत, व स्वार्थ पाहत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे पुतळे कधीही उभारू नका असे सांगूनही त्यांचे समर्थक आज त्याच्या पुतळ्याला इंदू मिलची जागा मागतात तर सरकार ती देऊन त्यांची तुष्टीकरण करते.प्रश्न या मागण्या आणि मतासाठीच्या तुष्टीकरणांचा नाही तर आम्ही या महान नेत्यांच्या विचारापर्यंत कधी पोहचणार आहोत हा आहे.महाराष्ट्रात किमान आपल्या अस्मितांची तरी दाखल घेतली जाते पण उत्तर प्रदेशात तर मायावतींनी स्वतःचे पुतळे उभारून आणखी कहर उडवून दिला होता त्या मानाने महाराष्ट्र बरा म्हणावा अशी परिस्थिती आहे.असो देशात पुतळ्याची नव्हे तर महान नेत्यांच्या विचारांची गरज आहे.म्हणून भाजप वाल्यानी या मुद्यावर राज्यातील जनतेला फसवावे असा अर्थ मुळीच नाही,या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी सरकारचे ते कर्त्यव्यच आहे.त्यात कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावीच पण अस्मितांचा बाजार मांडून मतदारांना फसविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही या निमित्ताने जनतेवर आहे हे विसरता येणार नाही.