जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्याचे वाटोळे कोणी केले हे तालुक्याला माहित -नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

कोपरगाव ( प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासह तालुक्याचे व तालुक्याच्या विकासाचे वाटोळे कोणी केले हे तालुक्यातील सर्व मतदारांना माहित आहे.केवळ कागदोपत्री विकासाचे आकडे फेकून विकास होत नसतो तर तो प्रत्यक्षात उतरावा लागतो अशी खोचक टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

कोपरगावसह राज्यातील 288 विधानसभेच्या जागांसाठी आगामी 21 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.त्यामुळे विधानसभेची राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे.आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.त्याची सुरुवात कोपरगावच्या सत्ताधारी गटाच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन केली आहे.त्यात त्यांनी कोपरगावच्या शहर विकासास व निळवंडे बंदिस्त जलवाहिनींस कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका सामाजिक कार्यकर्त्यांस पुढे करून अडथळा आणल्याचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती.त्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे हे काय उत्तर देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते.

कोपरगाव नगरपरिषदेच्या कामात सातत्याने अडथळे आणल्यामुळे निधी मिळाला नाही.चार कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्यात आला. आपण नगराध्यक्ष होण्याआधी अडीच वर्षे कोपरगाव नगरपरिषदेला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नंतर निधी का मिळू दिला नाही याचे उत्तर द्यावे.शहर विकास झाला तर जनता वहाडणे यांना श्रेय देईल असा संकुचित विचार झाल्यानेच लोकप्रतिनिधींनी अडचणी आणल्या.तरीही आपण अडीच वर्षात किमान सतरा कोटींची कामे मार्गी लावली,तर बरीच कामे सुरू केली आहेत.

त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि,राहाता नगरपरिषद “क ” वर्ग असूनही त्यांना तीस कोटी रुपयांचा निधी मिळू शकतो,पण कोपरगाव नगरपरिषद “ब” वर्ग असूनही पाच सात कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला नाही.कारण आपल्या लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात आपल्या पदाचा वापर करून कोपरगाव नगरपरिषदेला निधी मिळू दिलेला नाही.राहाता नगरपरिषदेच्या कारभारात प्रारंभीचा अपवाद वगळता कोणीही राजकिय अडथळे न आणल्यामुळे तेथे विकास कामांना निधी मिळाला,पण कोपरगाव नगरपरिषदेच्या कामात सातत्याने अडथळे आणल्यामुळे निधी मिळाला नाही.चार कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्यात आला. आपण नगराध्यक्ष होण्याआधी अडीच वर्षे कोपरगाव नगरपरिषदेला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नंतर निधी का मिळू दिला नाही याचे उत्तर द्यावे.शहर विकास झाला तर जनता वहाडणे यांना श्रेय देईल असा संकुचित विचार झाल्यानेच लोकप्रतिनिधींनी अडचणी आणल्या.तरीही आपण अडीच वर्षात किमान सतरा कोटींची कामे मार्गी लावली,तर बरीच कामे सुरू केली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णय होऊनही पाच क्रमांकाच्या साठवण तलावाला कोणी अडथळा आणला आहे हे आपण सप्रमाण सिद्ध केले आहे,ज्यांनी ते काम हाणून पाडले त्यांना त्या बाबत दाद मागण्याचा कोणताही अधिकार नाही. साठवण तलाव होऊ शकला नाही,कारण फक्त राजकारण.तरीही मी तो प्रयत्न सोडलेला नाही.केवळ कोट्यवधी चे आकडे फेकून जनता भूलणार नाही. कोपरगाव नगरपरिषदेत सहमती करून कुणी वाटोळे केले हे कोपरगावकर जनतेला माहित आहे नगरपरिषदेच्या वतीने आजही शहरात सर्वत्र विकासकामे सुरू आहेत.आधी तालुक्यात फिरून बघा आपली कर्तबगारी रस्त्याच्या रूपाने सर्वत्र दिसत आहे त्याला आधी तोंड द्या.साठ वर्ष कोपरगाव तालुक्यातील शेती सिंचनाचे व शेतीचे वाटोळे करणाऱ्या नेत्यांना माझ्याकडे तीन वर्षांचा हिशोब मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचेही वाहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close