कोपरगाव तालुका
कोपरगावात पवार समर्थक आंदोलनात राष्ट्रवादीचा नेताच गायब,तर्कवितर्कांना उधाण!
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याना राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी नोटीस धाडल्याने त्याचे पडसाद कोपरगावसह राज्यभर उमटले असून कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने काल संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले मात्र या आंदोलनाला कोपरगावचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळें व त्यांचे समर्थक गायब असल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या आंदोलनाला आधी कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप गंगूले यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काल निवेदन देऊन आंदोलन करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते .मात्र त्यानंतर आतील गोटातून कोपरगावातील वरिष्ठ नेत्यांनी हे आंदोलन दोन दिवस पुढे ढकल्यात यावे अशी सूचना केली मात्र पवार समर्थक कार्यकर्त्यांनी ती धुडकावून हे आंदोलन केल्याने या प्रश्नावर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे उघड झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,राज्यात आगामी महिन्यात एकवीस ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक संपन्न होत आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.त्यातच महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळ्या प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याना हजर राहण्याची नोटीस बजावली असल्याची बातमी बाहेर फुटली व काल राज्यात विविध ठिकाणी वाव कराष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलने केली.त्याचे पडसाद आज सकाळी कोपरगावात हि उमटल्याचे पाहावयास मिळाले.सदर ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,साई संस्थांनचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.त्यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या तर शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांच्याशी भ्रमनध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण बाहेर गावी असल्याचे सांगून आपली बोटे सोडूवून घेतली आहे.त्यामुळे आणखी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.दरम्यान राष्ट्रवादीचे युवानेते लोणी मार्गे भाजपच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय वृत्त यापूर्वीच सोळा जून रोजी दिलेली आहे.त्याला पुन्हा पुन्हा दुजोरा मिळत असल्याने सत्ताधारी गटाचा जीव दिवसेंदिवस कासावीस होत असून त्यांनी आपल्याला पुन्हा तिकीट मिळावे यासाठी जलसंपदाच्या वरिष्ठ मंत्र्यांचे या साठी बोट पक्के पकडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
सदर प्रसंगी जेष्ठ नेते संभाजी काळे,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके,जिल्हा सचिव सचिन मुजगुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार पोटे,श्री डुबे,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष राजन त्रिभुवन, माधवराव गायकवाड,शिरीष डुबे, राहुल शिरसाठ,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.त्यावेळी धरणे आंदोलनानंतर कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.